– ‘हर घर तिरंगा’ अभियानास जिल्हा परिषद प्रशासन सज्ज
The गडविश्व
गडचिरोली, ७ ऑगस्ट : भारतीया स्वातंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभुमिवर देशात सर्वत्र ‘आजादी का अमृत महोत्स’व साजरा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद गडचिरोली कडून मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली ९ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत स्वराज्य महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सोबतच १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत जिल्हाभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. सदर अभियानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वयंस्फुर्तीने आपल्या घरावर, दुकान, हॉस्पीटल, शाळा, इमारतीवर तिरंगा फडकवावा असे नागरिकांना आवाहन केले आहे.
देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्वव थाटात साजरा करण्यात येणार आहे. याअंतर्गत ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत स्वराज्य महोत्सव तर १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत संपुर्ण जिल्हयात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. स्वराज्य महोत्सव अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ८ ऑगस्ट रोजी घ्वज विक्री केंद्र उदघाटन, १० ऑगस्ट प्रभात फेरी, ११ ऑगस्ट वृक्षारोपन, १२ ऑगस्ट स्वच्छता मोहिम, वक्तृत्व स्पर्धा, १३ ऑगस्ट सायकल फेरी, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, १४ ऑगस्ट वैरागड स्थळ भेट, १५ ऑगस्ट ध्वजारोहण व तिरंगा बलुन सोडणे, १७ ऑगस्ट सांस्कृतीक कार्यकाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात सर्वाना सहभागी करून घेण्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून ठरविण्यात आले आहे. तर नगर परिषद क्षेत्र, ग्रामीण भाग यामध्ये प्रचार व प्रसिध्दी मोठया प्रमाणात करण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालये, गावांमध्ये प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
