The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ५ जानेवारी : येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी बुधवार ४ जानेवारी २०२३ रोजी शासनाचा २८ डिसेंबर २०२२ चा परिपत्रक शिक्षकावर अन्याय करणारा असल्याने तो रद्द करून अन्याय दुर करण्याच्या मागणीचे निवेदन धानोरा येथील तहसिलदार विरेंद्र जाधव यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावात शासनाचे हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या शाळेतील शिक्षकावर २८ डिसेंबर २०२२ रोजी परिपत्रक काढून आन्याय केलेला आहे. महाराष्ट्र राज्यात इंग्रज राजवटी पासून पासून सुरू असलेल्या शासकीय शाळेतील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक समाजातील गरीब व वंचित गटातील विद्यार्थ्यांना विद्याधानाचे कार्य करीत आहेत. तेव्हापासून आजता गायत शिक्षक जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग ३ मध्ये समाविष्ट होतो. व त्यामुळे सेवा जेष्ठतेच्या आधारे राजपत्रित अधिकारी वर्ग २ ची एकमेव पदोन्नती उपशिक्षणाधिकारी व त्तसंमपदावर होत होती. परंतु २८ डिसेंबर २०२२ रोजी शासनाने अधिसूचना काढून त्यात सर्व माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक वर्ग ३ यांना जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग ३ मधून वगळल्याने मिळणारी एक मात्र पदोन्नती हिसकावून अन्याय केलेला आहे, शासनाने आमच्यावर अन्याय करुन आमचा घात केलेला आहे त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक वर्ग ३ या अन्यायकारक अधिसूचना २८ डिसेंबर २०२२ रद्द करावी व ५ जुलै २०१६ ची अधिसूचना कायम करण्यात यावी अशी मागणी अन्यायग्रस्त माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय धानोरा जिल्हा गडचिरोली येथील शिक्षक डी. टी .कोहाडे, रश्मी डोके, पी.व्ही. साळवे, एस.एम. रत्नागिरी, व्हि.एम. बुरमवार, पी.बी .तोटावार, स्नेहा हेमके व रजनी मडावी यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.