धानोरा न.पं.उपाध्यक्ष ललित बरछा यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

259

– २७ रक्तदात्यांनी पुढाकार घेत केले रक्तदान
The गडविश्व
धानोरा : जिल्हातील रक्ताचा तुटवडा बघता सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्यकर्ते तथा धानोरा नगरपंचायतीचे उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती ललित बरछा यांचा वाढदिवस काल १ एप्निल २०२२ रोजी धानोरा येथील कृषी भवन येथे रक्तदान करुण साजरा करण्यात आले. वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल २७ जणांनी रक्तदान केले.
यावेळी धानोरा न.पं. च्या नगराध्यक्षा पौर्णिमा सयाम, माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, सभापती कालिदास मोहुर्ले, सभापती माणिकशहा मडावी, सभापती सिमा कोटांगे, नगरसेवक अल्का मशाखेत्री, देवांगणी चौधरी, कल्याणी गुरनुले, यामीना पेंदाम, सुषमा भुरसे, नरेश चिमूरकर, प्रदिप बोगा, भूषण उंदिरवाडे, स्विकृत नगरसेवक मल्लीक बुधवाणी, डॉ. दिलीप बर्वे, अक्षय भिष्णूरकर, नयन फुलझले, निशांत देशमुख, प्रमोद सहारे, भूषण फरांडे आदी मित्र परिवार व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
रक्तदान हेच श्रेष्ठ दान या म्हणी प्रमाणे रक्तामुळे माणसाला जिवनदान मिळते .रक्ताचा तुटवडा भासू नये आणि गरजूना रक्त उपलब्ध व्हावा यासाठी हा रक्तदानचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. कोरोनाच्या काळातील रक्ताचा तुटवडा पाहता, रक्तदानाचा उपक्रम महत्वाचा ठरतो. वाढदिवसाला उत्स्वी रुप न देता रक्तदानसारख्या प्रवित्र कार्यामधून कार्यकर्त्यांनी उपाध्यक्ष ललिता बरछा यांना शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये २७ रक्तदात्यांनी पुढाकार घेत रक्तदान केले. यात तरूणाईचा सहभाग लक्षणीय होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here