धक्कादायक : मौशिखांब येथे विनापरवाना चालत होता दवाखाना, बोगस डॉक्टरवर कारवाई

198

– औषधी प्रशासन विभागाने कारवाई करत औषधीसाठा केला जप्त
The गडविश्व
गडचिरोली-अमिर्झा, १२ नोव्हेंबर : अनेक दिवसांपासून मौशिखांब येथे विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय चालवत असलेल्या बोगस डॉक्टरवर औषधी प्रशासन विभागाने गुरुवारी कारवाई करत औषधीसाठा जप्त केला आहे.
तालुक्यातील मौशिखांब येथे डॉ.बिबिसा अनिल मंडल हे विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय चालवत होते. दरम्यान गुरुवारी औषधी प्रशासन विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त नीरज लोकरे आणि औषधी निरीक्षक नालंदा उरकुडे यांनी मौशिखांब येथे येथे दुपारी धाड मारली. यावेळी विनापरवाना व्यवसाय करण्यासोबतच मनुष्य जीवनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असणारी औषधी आढळून आली असता ती जप्त करण्यात आली. दरम्यान एफडीएच्या अधिकाऱ्यांना शेड्युल एच 1 गटातील औषधी आणि स्टेरॉईड गटातील औषधे सर्रास वापरली जात असल्याचे आढळले व ती जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.
सदर कारवाईने विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून जिल्हाभरात तसेच गडचिरोली शहरात अशाप्रकारे किती जण विनापरवाना आपला वैद्यकीय व्यवसाय थाटून बसले आहेत हे तपासणे सुद्धा आवश्यक आहे असे नागरिक बोलत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here