दारूविक्री केल्यास ठोठावणार दंड

156

– मसेली येथे ग्रापं समितीची बैठक
The गडविश्व
गडचिरोली : कोरची तालुक्यातील मसेली येथे मुक्तिपथ ग्रापं समितीची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी ग्रापं समिती पुनर्गठित करून अवैध दारू व तंबाखूविक्रीचे प्रमाण कमी करण्यासाठी चर्चा करण्यात आली. तसेच दारूविक्री केल्यास 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी मुक्तिपथ अभियान गावस्तरीय रचनेची माहिती देण्यात आली. मुक्तिपथ ग्रामपंचायत समिती पुनर्गठित करण्यात आली. या समितीच्या अध्यक्ष,सचिव व सदस्यांची निवड करण्यात आली. ग्रापं समितीद्वारे मुक्तिपथ गाव संघटनेला मान्यता देण्यात आली. गावातील अवैध दारू व तंबाखूविक्री कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, अहींसक कृती व उपचार शिबीर आयोजित करणे यावर चर्चा करण्यात आली. तसेच समीतीच्या माध्यमातून अवैध दारु विक्री करणाऱ्यावर ५ हजार व तंबाखू विक्री करणाऱ्यांवर २ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावणे. कार्यालयीन वेळात व्यसन करुन येणाऱ्यांकडून ५०० रुपयांचा दंड वसूल करण्याचे सुद्धा ठरविण्यात आले. यावेळी समीतीचे अध्यक्ष सुनिल सयाम, उपाध्यक्ष इंदिरा सिद्राम, सचिव बनसोड, सहसचिव पि.जे.उईके, उपसरपंच विरेंद्र जांभुळकर, डॉ. दाजगाये, रुपेश कुमरे यांच्यासह ग्रापं सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here