– सरपंच तुळशीराम मडावी यांचे प्रतिपादन
The गडविश्व
गडचिरोली : गावात दारूबंदी करणे व टिकवणे हे सर्वांचे आद्य कर्तव्य व जबाबदारी आहे. गावातील आरोग्य अबाधित राखण्याकरिता सर्वानी दारू पिणे बंद करावे व विक्री सुद्धा करू नये, असे आवाहन मुक्तिपथ ग्रापं समितीचे अध्यक्ष तथा सरपंच तुळशीराम मडावी यांनी केले.
एटापल्ली तालुक्यातील दुर्गम अशा दिंडवी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच तुळशीराम मडावी यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. यावेळी मुक्तिपथ ग्रामपंचायत समिती गठीत करण्यात आली. नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी मडावी यांची निवड करण्यात आली. सचिव एस.एस.येरमे, सदस्यपदी गीता मोहुर्ले, साधना उसेंडी, मडावी, कौशिक आवळे, विजय ताडाम, वचला उसेंडी आदींची निवड करण्यात आली. यावेळी ग्रापं समितीच्या अटी व कृती यावर मुक्तीपथ तालुका संघटक किशोर मलेवार यांनी मार्गदर्शन केले. तसेच गावातील अवैध दारूविक्री, घरगुती होणारा दारूचा वापर इत्यादी बंद करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. यावेळी गावातील नागरिक उपस्थित होते.