‘दामिनी’ ॲपने जीवितहाणी टाळावी

219

महाराष्ट्र राज्यात काही भागात मान्सून पावसाला सुरूवात होऊन महिना झाला आहे. मान्सून सक्रीय होत असताना गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन पावसाने हजेरी लावलेली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या पंधरवाड्यात वीज पडून जनावरे दगावली आहेत. विजांसह होणाऱ्या पावसाचे पुर्वानुमान शेतकऱ्याला समजावे व जीवितहानी टाळल्या जावी यासाठी पुण्यातील भारतीय उष्णप्रदेशीय हवामान संशोधन संस्था (आय.आय.टी.एम.) यांनी ‘दामिनी’ हे ॲप विकसित केले आहे.
शहरी भागाप्रमाणे ग्रामिण भागात सुध्दा वीज पडून अनेकांचा मृत्यू होतो व जीवीतहानी होते. हे सर्व टाळणे हा दामिनी ॲप विकसित करण्यामागील मुख्य उद्देश आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग व राज्यातील कृषि विद्यापीठे यांचा या ॲपच्या प्रसिध्दी व वस्तारीकरणात मोलाचा वाटा आहे.
दामिनी ॲपसाठी भारतीय उष्णप्रदेशीय हवामान संशोधन संस्था (आय.आय.टी.एम.) यांनी लायटनिंग लोकशन मॉडेल विकसित करून ठिकठिकाणी माहिती संकलित करण्यासाठी व उद्ययावत सूचना देण्यासाठी सेन्सर बसविले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सदर ॲप डाऊनलोड करून त्याचा लाभ घ्यावा व जीवितहानी टाळावी असे आवाहन कृषि हवामान तज्ञ नरेश बुध्देवार व कृषि हवामान निरीक्षक मोहीतकुमार गणविर, जिल्हास्तरीय कृषि हवामान केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांनी केले आहे.

विजेसंबंधी शास्त्रीय माहिती, वीज पडणार असल्यास नागरिकांनी/ शेतकऱ्यांनी घ्यावयाची दक्षता, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटाचा अचूक अंदाज ई. माहीती दामिनी ॲपमध्ये आहे. स्मार्ट फोन/ ॲडंरॉईड मोबाईल धारकांनी (शेतकऱ्यांनी / नागरीकांनी) गुगल प्ले स्टोअरमधून हे ॲप डाऊनलोड करून शेतकऱ्यांनी /नागरीकांनी आपले लोकेशन टाकल्यावर आपणास विजेसंबंधी पूर्वसूचना व इतर माहिती मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here