तुकुम येथे ग्रामस्वच्छता अभियान तपासणीसाठी जिल्हास्तरीय समितीची भेट

149

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १६ सप्टेंबर : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तथा संत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय समिती २०२१-२२ अंतर्गत नुकतीच ग्रामपंचायत तुकूम, पंचायत समिती धानोरा येथे भेट दिली. या भेटीदरम्यान गडचिरोली पंचायत समिती गट विकास अधिकारी धनंजय साळवे, शकृषी अधिकारी पदा, बीआरसी बाराये, पर्यवेक्षीका श्रीमती शेबे यांचा जिल्हास्तरीय तपासणी समितीमध्ये, समावेश होता.
तपासणी समितीमध्ये जिल्हा परिषद शाळा पाहणी, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र, सार्वजनिक शौचालय, वैयक्तिक शौचालय, नाली, रस्ते इत्यादीची पाहणी केली. यावेळी धानोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मुक्तेश्वर कोमलवार, तुकूम च्या सरपंचा सौ.सुमित्रा तोफा, उपसरपंच सदुराम मडावी,ग्रा.पं.सदस्य विकास जाडे, सचिव एम.टी.मेश्राम, ग्रामपंचायत कर्मचारी योगेश गेडाम, माचिंद्रणाथ गोटा तथा समस्त ग्रामवासिय उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here