टिआरटिआय आणि युनिसेक इंडियाचे आदिम जमाती करीता नाविण्यपुर्ण उपक्रम

411

– गडचिरोली येथे आदिम जमाती बहुल सूक्ष्म नियोजन केंद्राचे उदघाटन

The गडविश्व
गडचिरोली : आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे व युनिसेक इंडिया अंतर्गत आदिम जमाती बहुल सूक्ष्म नियोजन केंद्र, गडचिरोली यांचे उद्घाटन नुकतेच २७ मे रोजी पार पडले. आदिवासी समुदायाच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतीक विकासाकरीता गडचिरोली जिल्हयातील माडीया या आदिम जमातीच्या संवर्धन व विकासाकरीता सूक्ष्म नियोजन करणे, सूक्ष्म उपाययोजना निर्माण करणे, आदिम जमातींचे स्थलांतरण कमी करण्याकरीता उत्पादनाच्या साधनांचे स्थलांतरण कमी करण्याकरीता उत्पादनाच्या साधनाचे बळकटीकरण करणे, स्थानिक पातळीवर रोजगार व स्वंय रोजगाराच्या संधी निर्माण करणे, आदिम जमातीच्या विकासाकरीता विविध उपाययोजना करणे व आदिम जमाती विकास प्रकल्प गतिमान करणे असे या केंद्राचे उद्देष व कार्य प्रणाली आहे.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटक सहाय्यक प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग गडचिरोलीचे प्रभु सादमवार व सहाय्यक प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग गडचिरोलीचे सुधाकर गौरकर यांच्या हस्ते पार पडले. आदिम जमाती बहुल क्षेत्रातील सूक्ष्म नियोजन केंदामार्फत आदिवासींच्या विकासासाठी काम केले जाणार आहे. तर त्याआधी त्यांच्या कामाचे सूक्ष्म नियोजन करावे लागेल व त्याकरीता डेटाबेस असणे आवश्यक आहे. आदिवासींना त्यांचे हक्क व अधिकारांची जाणीव करुन देणे गरजेचे आहे व त्यासाठी जाणीव जागृती करण्याची गरज आहे असे मत आपल्या मार्गदर्शनात सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुधाकर गौरकर यांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व मार्गदर्शक कृषी विज्ञान केंद्र, सोनापुर गडचिरोलीचे प्रकल्प संचालक डाॅ. संदिप कराडे, सामाजिक वनिकरण गडचिरोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी धिरज ढेंबरे, कृषी विज्ञान केंद्र गडचिरोलीचे ज्ञानेश्वर तातोडे आदि उपस्थित होते.
आदिम जमाती बहुल क्षेत्रातील सूक्ष्म नियोजन या कार्यालयाच्या माध्यमातून गावपातळीवर जाऊन या केंद्राच्या यशस्वितेसाठी आपल्या क्षमतांची क्षमता बांधणी करुन हा प्रकल्प पुढे घेऊन जाणार असा विश्वास प्रकल्प संचालक संजय इंगळे यांनी उपस्थितांना दिला. कार्याक्रमाचे प्रास्ताविक सादर करतांना आदित जमाती बहुल क्षेत्रातील सूक्ष्म नियोजन या केंद्राचे केंद्र समन्वयक ललित साखरे यांनी आदिवासी विकासाला चालणा देण्यासाठी व आदिवासींच्या जिवनामध्ये समुदायाची संस्कृती व वारसा टिकवून ठेवत त्यांच्यात विकासात्मक बदल घडवून आणण्यासाठी युनिसेक इंडिया कटिबध्द राहणार असे मत व्यक्त केलेे. संचालन कु. दुर्गा तुमडाम, ज्ञानेश्वरी लोंढे यांनी केले तर आभार प्रफुल मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला संपुर्ण अधिकारी वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here