– नागरिकांना अहेरीत सुरक्षित हलविले
The गडविश्व
अहेरी : (Aheri) अहेरी तालुक्यातील येंकटरावपेठा ग्राम पंचायत अतंर्गत येत असलेल्या अबनपल्ली येथे मागील अनेक दिवसापासून सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे गावाला तिन्ही बाजूंनी पुराच्या पाण्याने वेढलेले होते. पुराचा संभाव्य वाढता धोखा बघता त्या गावकऱ्यांना इतर ठिकाणी हलविणे गरजेचे होते. (Ajay Kankadalwar) जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी लागलीच अबनपल्ली येथे पाण्यातून वाट काढत धाव घेऊन नागरिकांना सुरक्षित गावाबाहेर काढून अहेरी येथे हलविले.
गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. अहेरी तालुक्यातील येंकटरावपेठा ग्राम पंचायत अतंर्गत येत असलेल्या अबनपल्ली हे गाव मागील अनेक दिवसापासून ससुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे गावाला तिन्ही बाजूंनी पुराच्या पाण्याने वेढलेले होते. मात्र तेथील नागरिक बाहेर जाण्यास तयार नव्हते सदर बाब जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवारयांना माहिती होताच त्यांनी अबनपल्ली येथे पाण्यातून वाट काढत पोहचत नागरिकांशी चर्चा केली व पुराचा वाढत संभाव्य धोका लक्षात घेता या ठिकाणावरून इतर ठिकाणी स्थलांतरित होणे गरजेचे आहे असे सांगितले असता नागरिकांनी त्यांचे ऐकून घेतले. व त्यानंतर अहेरीचे तहसीलदार ओतारी यांना पाचारण करून वाहन बोलवून सदर गावातील ८० ते १०० नागरिकांना अहेरी येथील एकलव्य शाळेत सुरक्षित हलविण्यात आहे.
https://twitter.com/gadvishva/status/1547841430143770624?s=19