जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते किष्टापूर (वेल) येथील नवीन ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण

540

The गडविश्व
गडचिरोली : अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या किष्टापूर वेल येथे ग्रामपंचायत भवन उपलब्ध नसल्याने नागरिकांना अडचण होत होती. जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे मागणी केली असता जि.प.अध्यक्ष यांनी ग्रामपंचायत भवनासाठी जिल्हा परिषदेचे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान व 14 व्या वित्तअंतर्गत निधी उपलब्ध करून दिले. सदर नवीन ग्रामपंचायत भवनाची बांधकाम पूर्ण पणे झाले असुन सुसज्ज इमारत उभी झाली आहे. आज सदर ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
यावेळी लोकार्पण कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थिति होती तर प्रमुख पाहुने म्हणून अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे होते तसेच अहेरी पं. स. उपसभापती सौ. गीता ताई चालूरकर, माजी जि. प. अध्यक्ष तथा विद्यमान सदस्या सौ.भाग्यश्रीताई हलगेकर (आत्राम) , किष्टापूरचे सरपंच नंदू तेलामी, उपसरपंच पवन आत्राम, ग्रामपंचायत सदस्या रसिका सडमेक, योगिता करपेत, मयूरी तलांडी, नरेश मडावी, दादाराव मडावी, वेलगूरचे उपसरपंच उमेश मोहुर्ले, प्रशांत गोडसेलवार, पुणेश कंदीकुरवार, इरशाद शेख, प्रकाश दुर्गे, राकेश सडमेक, प्रमोद गोडसेलवार आदी मंचावर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here