– ५ मार्च रोजी पुणे येथे पुरस्कार वितरण सोहळा
The गडविश्व
गडचिरोली : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांना जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशन महाराष्ट्र तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार २०२२ जाहिर करण्यात आला आहे. याबाबतचे पत्र जिल्हा परिषद अध्यक्षांना प्राप्त झाले आहे.
जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असासिएशन महाराष्ट्र तर्फे सदस्यांना पुरस्कार देण्यात येतो. असोसिएशनतर्फे घेण्यात येणारा मार्च २०२२ मधील राज्यस्तरीय पुरस्कारासाठी गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांची निवड करण्यात आली आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा ५ मार्च २०२२ रोजी अण्णाभाऊ साठे सभागृह एअरपोर्ट रोड येरवडा येथे आयोजीत करण्यात आला आहे. याकरिता जि. प. अध्यक्षांना आमंत्रित करण्यात आले आहे. जि.प.अध्यक्षांच्या या पुरस्कार निवडीबद्दल त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशन महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष रत्नागिरी उदय बने, राज्य महिला उपाध्यक्ष सौ.सरिता गाखरे, राज्य चिटणीस सुभाष घरत, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष शरद बुट्टे पाटील, राज्य उपाध्यक्ष जयमंगल जाधव तसेच इतर राज्य कार्यकारणी सदस्य यांनी सुध्दा पुरस्कार जाहिर झाल्याने अभिनंदन केले आहे.
