– गोसीखुर्द धरणाच्या पाण्याच्या विसर्गात वाढ
The गडविश्व
गडचिरोली, १७ ऑगस्ट : जिल्हातील चामोर्शी तालुक्यात वैनगंगा नदीवर असलेल्या चिचडोह बॅरजचे सर्वच दरवाजे उघडले असून पाण्याचा विसर्ग 7,51,574 क्युसेक्स (21,282 क्युमेक्स) एवढा आहे. तर गोसीखुर्द धरणाचेही दरवाजे सर्वच दरवाजे उघडल्याने नदया फुगल्या आहे. यामुळे जिल्हयातील अनेक भागात पुरपरिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावे पुन्हा एकचा पाण्याखाली आले आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. यामुळे पुन्हा एकदा अनेक गावांचा जिल्हयाशी संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
जिल्हा पुरनियंत्रण कक्ष गडचिरोली कडून जिल्हयातील पुरपरिस्थितीबाबत दुपारी 3 वाजताच्या मिळालेल्या अहवालानुसार, वैंनगगा नदी- संजय सरोवर धरणाचे 10 पैकी 10 दरवाजे बंद असून पॉवर हाऊसव्दारे 200 क्युसेक्स (5.66 क्युमेक्स) विसर्ग सुरू आहे. तर गोसीखुर्द धरणाचे सर्वच 33 दरवाजे उघडले असून 23 दरवाजे 2.50 मीटरने तर 10 दरवाजे 2.0 मीटरने उघडले असून विसर्ग 5,32,268 क्युसेक्स (15,072 क्यमेक्स) आहे. तसेच चिचडोह बॅरेज चे सर्वच 38 दरवाजे उघडले असून विसर्ग 7,51,574 क्युसेक्स (21,282 क्युमेक्स) आहे. वडसा, वाघोली व आष्टी या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी धोका पातळीच्या वर आहे.
वर्धा नदी :
• उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे 13 पैकी 13 गेट 0.20 मी. ने उघडलेले असुन विसर्ग 14,691 क्युसेक्स (416 क्युमेक्स) आहे.
• निम्न वर्धा प्रकल्पाचे 31 पैकी 23 गेट 0.15 मी. ने उघडलेले असुन विसर्ग 10,912 क्युसेक्स (309 क्युमेक्स) आहे.
• बामणी (बल्हारशा) व सिरपूर/सकमुर केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.
प्राणहिता नदी :
महागांव सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार प्राणहिता नदीची पाणी पातळी धोका पातळीच्या वर आहे.
गोदावरी नदी :
• श्रीपदा येलमपल्ली प्रकल्पाचे 62 पैकी 20 गेट उघडलेले असुन विसर्ग 70,988 क्युसेक्स (2,010 क्युमेक्स) आहे.
• लक्ष्मी बॅरेज (मेडीगड्डा) चे 85 पैकी 85 गेट उघडलेले असुन विसर्ग 10,25,602 क्युसेक्स (29,042 क्युमेक्स) आहे.
• कालेश्वरम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या वर आहे.
इंद्रावती नदी :
• चिंदनार सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इंद्रावती नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या वर आहे.
• जगदलपूर व पाथागुडम या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इंद्रावती नदीची पाणी पातळी धोका पातळीच्या वर आहे.
• पर्लकोटा नदी भामरागड सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार धोका पातळीच्या वर आहे.
इशारा :
नद्यांच्या पाणलोट क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे व उर्ध्व भागातील धरणांमधून विसर्ग प्रवाहीत करण्यात आल्याने नद्यांची पाणी पातळी वाढलेली आहे, तरी नदीकाठावरील गावातील नागरीकांनी उचित सतर्कता बाळगावी