The गडविश्व
प्रतिनिधी / पेंढरी : स्थानिक ग्रामपंचायत मध्ये आज ६ जून रोजी शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशव राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात आली, भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशव राजदंड स्वराज्यगुढी उभारून त्यास अभिवादन करून राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ रोजी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. हा दिवस स्वराज्याची सार्व भौमत्काची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. अशा या दिनाचे महत्व आणखी दृढ होण्यासाठी ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागाने घेतला आहे. बहुजनाचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज आपल्या राज्याच्या उभारणीसाठी त्यांनी घेतलेले निर्णय, व्यवस्थापण, चातूर्य, शौर्य आणि जातधर्मविरहीत मानवतावादी दृष्टीकोन ही आजच्या पिढीला मिळालेली देणगी आहे. अशा या पराक्रमी राजाचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी पार पडला. जो आज शिवराज्याभिषेक सोहळा म्हणून साजरा केला जातो.
छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी मनाचा आणि अस्मितेचा अभिमान आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्यांनी केवळ मुठभर मावळ्यांच्या जीवावर स्वराज्याची जी मुहूर्तमेढ रोवली ती त्यांना पुढे जनतेचा राजा छत्रपती करुन गेली.
या शिवस्वराज्य दिन, राज्याभिषेक दिन कार्यक्रमाला सरपंच पवन येरमे, शिवसेना तालुका प्रमुख किरण शेडमाके, कालीदास लेनगुरे, प्रशांत पेदापल्लीवार, कुंदन मोहूर्ले अक्षय लेनगुरे, मंजुषा पवार ग्रामपंचायत सदस्या मायाताई देवताळे, प्रियाताई दुग्गा ग्रामपंचायत कर्मचारी गावातील नागरिक उपस्थित होते.