गोरजाई माता मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी सर्वतोपरी मदत करणार : आमदार कृष्णाजी गजबे

448

– वैरागड येथे अयोजीत गोरजाई महोत्सवात आमदार गजबे यांचे प्रतिपादन

The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यातील वैरागड येथे असलेले गोरजाई माता मंदिर हे आदिवासी माना समाजाचे आराध्य दैवत आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सर्वोतपरी मदत करणार असे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार गजबे यांनी केले. ते काल वैरागड येथील गोरजाई माता मंदिर येथे आयोजित गोरजाई महोत्सवात कार्यक्रमाच्या उदघाटन स्थानावरून बोलत होते.
आदिवासी माना समाजाच्या वतीने १९ व २० मार्च दोन दिवसीय गोरजाई महोत्सवाचे आयोजन वैरागड येथील गोरजाई मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसीय महोत्सवात १९ मार्च रोजी मूठपूजा, बेरोजगार शिबीर, जात वैधता व समस्यांवर चर्चा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच २० मार्च रोजी आरोग्य शिबीर, मार्गदर्शन, सत्कारचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री रमेशजी गजबे, तर उदघाटन म्हणून आमदार कृष्णाजी गजबे, डॉ.शिवनाथ कुंभारे उपस्थित होते तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंडित पुडके, ॲड. वामनराव ननावरे, शत्रुघ्न चौधरी, कमला ननावरे, जिजा राणे, माजी जि.प. विश्वास भोवते, केशव गेडाम, कुसुम रंदये,भोलू सोमनाई, वासुदेव धरणे, अरविंद सांदेकर, प्रा.दिनकर चौधरी, सुभाष दडमल, सरपंचा संगीत पेंदाम, उपसरपंच भास्कर बोडणे, महादेव दुमाणे, छानू मानकर, आदेश आकरे, प्रा. प्रदीप बोडने, संगीत मेश्राम, डोनु कांबळे, विद्या गजबे, पोलीस निरीक्षक मनोज काळबांधे, पोलीस पाटील गोरख भानारकर प्रामुख्याने उपस्थित होते.आमदार कृष्णाजी गजबे पुढे बोलताना म्हणाले कि, जिल्ह्यातील वैरागड येथे असलेले गोरजाई माता मंदिर हे आदिवासी माना समाजाचे आराध्य दैवत आहे, या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सर्वोतपरी मदत करत आवश्यक निधी उपलब्ध करून दिल्या जाईल व या स्थळाला पर्यटनाचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करू असे प्रतिपादन केले. गोरजाई महोत्सवाला शेकडो आदिवासी माना समाज बांधवानी उपस्थिती दर्शविली होती. यावेळी मोफत आरोग्य शिबीर गडचिरोली येथील ध्वनंतरी हॉस्पिटलच्या वतीने घेण्यात आले होते. आरोग्य शिबिराचे उदघाटन डॉ. शिवनाथ कुंभारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेकडो समाजबांधवांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.तसेच या कार्यक्रमा दरम्यान नुकतेच पीएसआय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अश्विनी भरडे, एसबीजी सोयाबीन वाणाचे संशोधक सुरेशजी गरमडे व आदींचा सत्कार करण्यात उपस्थित आमदार कृष्णाजी गजबे, डॉ. शिवनाथ कुंभारे यांच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवात डॉ. शिवनाथ कुंभारे यांच्या वतीने १०० ग्रामगीता पुस्तकाचे वितरण हि करण्यात आले.सदर कार्यक्रम शेकडो समाज बांधवांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वामनराव सावसाकडे, संचालन भारत राणे, आभार प्रा. राजू केदार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here