गूंम्मलकोंडा येथील राजराजेश्वर स्वामी मंदिर बांधकामासाठी सर्वतोपरी मदत करणार : मा.जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार

322

– मा.जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांच्यातर्फे मंदिर बांधकामासाठी आर्थिक मदत

The गडविश्व
सिरोंचा : तालुक्यातील गूंम्मलकोंडा येथे श्री राजराजेश्वर स्वामीचे मंदिर असून मंदिर बांधकामासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार व आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांनी आर्थिक मदत केली. यावेळी मा.जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मंदिर दुरुस्ती व विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार असे आश्वासन दिले.
गूंम्मलकोंडा येथील राजराजेश्वार स्वामी मंदिर खूप जुनी असून गावातील नागरिकांची आस्था असून गावातील नागरिक रोज पुजपाठ करतात. मंदिर खूप जुनी असल्याने दुरुस्ती करणे गरजेचे होते. त्यासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार व आविसं तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांनी मंदिर दुरुस्ती व विकासासाठी आर्थिक मदत केली. यावेळी गावातील नागरिकांनी आनंद व्यक्त करत आभार मानले आहे.
यावेळी सरपंच रमेश तैनेनी, सरपंच हनुमंतू कोय्याला, उपसरपंच रामचंद्र गोगूला, राजराजेश्वर स्वामी मंदिराचे पुजारी, समय्या चौधरी, आविसं जेष्ठ नेता शंकर मंदा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मल्लिकार्जुन आकुला, सरपंच सुरज गावडे, लक्ष्मण गावडे, समय्या तेरकरी, नरेश नरेश धर्मी, संतोष भीमकरी, आविसं सोशल मीडिया प्रमुख तिरुपती चिट्याला, महेश तलांडी, राकेश, तिरुपती येलकुरती, शैलेंद्र कलाकोटा, रितेश मंचारला, पोलीस पाटील शिवराम मेडीझरलासह गूंम्मलकोंडा व मोटला टेकडा परिसरातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here