गावसंघटनेच्या मागणीनुसार गावागावात शिबीर
– तीन गावातील ४० रुग्णांनी घेतला लाभ
The गडविश्व
गडचिरोली, २८ सप्टेंबर : गाव संघटनेच्या मागणीनुसार मुक्तीपथ तर्फे गावागावात व्यसन उपचार शिबिरांचे आयोजन केल्या जात आहेत. नुकतेच कसूरवाही, मेंढा व अबानपल्ली येथे पार पडलेल्या शिबिराचा एकूण ४० रुग्णांनी लाभ घेतला. सोबतच रुग्णांना समुपदेशन करीत दारूच्या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.
एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम कसूरवाही येथील शिबिरात १३ रुग्णांनी उपचार घेतला. रुग्णाची नोंदणी तालुका प्रेरक रवींद्र वैरागडे यांनी केली. रुग्णाची केस हिस्ट्री संयोजिका पूजा येलुरकर तर समुपदेशन साईनाथ मोहूर्ले यांनी केले. क्लिनिकचे नियोजन व व्यवस्थापन मुक्तीपथ तालुका संघटक किशोर मलेवार यांनी केले. यशस्वीतेसाठी मुक्तीपथ गाव संघटन सदस्य राजू नरोटे, गाव पाटील नामदेव हिचामी, आशा वर्कर गुलाबीताई तिरकी , दाऊत तिरकी, मुख्याध्यापिका स्नेहलता वालको यांनी सहकार्य केले. धानोरा तालुक्यातील मेंढा येथील एक दिवसीय व्यसन उपचार शिबिरात एकूण १६ पेशंटणी उपचार घेतला. समुपदेशन छत्रपती घवघवे तर केस हिस्ट्री प्राजक्ता मेश्राम यांनी घेतली. रूग्णांची नोंदणी व नियोजन राहुल महाकुलकार यांनी केले. अहेरी तालुक्यातील अबानपल्ली या गावात आयोजित शिबिरात 13 जणांनी नोंदणी केली व ११ रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला. समुपदेशन साईनाथ मोहूर्ले यांनी केले. केस हिस्ट्री संयोजिका पूजा येलूरकर यांनी घेतली. उपक्रमाचे नियोजन तालुका प्रेरक आनंदराव कुम्मारी व स्पार्क कार्यकर्ता स्वप्नील बावणे यांनी केले. यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सदस्य महेश कुमराम, अंगणवाडी सेविका राजश्री मडावी, आशा वर्कर हर्षा गरगम यांनी सहकार्य केले. अशा एकूण ४० रुग्णांनी उपचार घेत दारूच्या व्यसनातून मुक्त होण्याचा निर्धार केला आहे.


