गडचिरोली : ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर मतदार यादी चा विशेष संक्षिप्त पूनरीक्षण कार्यक्रम

451

– जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय मीना यांची पत्रकार परिषदेत माहिती
The गडविश्व
गडचिरोली, ११ नोव्हेंबर : भारत निवडणूक आयोगाच्या २५ जुलै २०२२ च्या पत्रान्वये १ जानेवारी २०२३ या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादी चा वार्षिक विशेष पूर्ण निरीक्षण कार्यक्रम ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत घोषित करण्यात आला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय मीना यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

वार्षिक विशेष संक्षिप्त पूनरीक्षण कार्यक्रम

९ नोव्हेंबर २०२२ रोजी एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे, ९ नोव्हेंबर २०२२ ते ८ डिसेंबर २०२२ पर्यंत दावे व हरकती स्वीकारणे, दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी निश्चित केलेले दोन शनिवार व रविवार अनुक्रमे १९ व २० नोव्हेंबर २०२२ तसेच तीन व चार डिसेंबर २०२२ यावेळी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे तसेच २६ डिसेंबर २०२२ पर्यंत दावे व हरकती निकालात काढण्यात येणार आहेत तर ५ जानेवारी २०२३ ला मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येणार आहे.

आतापर्यंत मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी हा अहर्त दिनांक असायच. म्हणजे १ जानेवारी किंवा त्याआधी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता यायची मात्र २०२३ पासून भारत निवडणूक आयोगाने आता चार अहर्ता दिनांक अनुक्रमे १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै व १ आक्टोंबर किंवा त्याआधीच्या नागरिकांची १८ वर्षे पूर्ण होतील त्यांना ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या विशेष मोहिमे अंतर्गत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. ९ नोव्हेंबर २०२२ रोजी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय तसेच सर्व मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप मतदार यादी प्रकाशित केलेली आहे. मतदारांनी आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदार संघ इत्यादी तपशील मतदार यादी तपासून ते अचूक आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे. बरेचदा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते त्यामुळे मतदारांनी प्रारूप मतदार यादीतील आपले तपशील आत्ताच तपासने महत्त्वाचे आहे. ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ हा कालावधी मतदार नोंदणीचा आहे, तसा तो एखाद्याच्या नावासंबंधी हरकती घेण्याचाही आहे. एखाद्या मतदारसंघातील एखादा मतदार, यादीत दिलेल्या पत्त्यावर राहत नसेल तर अशा नावांबद्दल त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतो. त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करून संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते. मतदार याद्यांची अद्ययावतीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदारांची वगळणी ही महत्त्वाची असते. यंदाच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने १९ व २० नोव्हेंबर आणि ३ व ४ डिसेंबर या दिवशी जिल्हाभर विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच वंचित घटकांसाठी खास शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. जसे महिला व दिव्यांग, तृतीय पंथीय नागरिक, देह व्यवसाय करणाऱ्या महिला आणि घर नसलेली भटक्या व विमुक्त जमातीचे नागरिक.
ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने १० नोव्हेंबर रोजी जिल्हाभर विशेष ग्रामसभेची आयोजन केले होते. या दिवशी जिल्ह्यातील ग्रामसभांमध्ये मतदार यादीचे वाचन केले गेले. त्या अंतर्गत नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्या स्त्रिया, गावात कायमस्वरूपी नव्याने वास्तव्यस आलेली नागरिक यांची नोंदणी करण्यासाठी नमुना अर्ज ६ गोळा करण्यात आले आहे. तसेच दुबार नावे, मृत व्यक्ती, गावातून कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया यांच्या नावांची मतदार यादीतून वगळणी करिता नमुना अर्ज ७ गोळा करण्यात आलेले आहे. निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांसाठी विशेष पीडब्ल्यू या ॲपची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वापरण्यास सहज-सुलभ असलेल्या या ॲपच्या सहाय्याने दिव्यांग मतदारांना नाव नोंदणी करता येईल. ज्यांची नाव नोंदणी आधीच झाली आहे पण दिव्यांग म्हणून नोंद नसेल त्यांना या ॲपवरून दिव्यांगत्व चिन्हांकित करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. दिव्यांगत्व चिन्हांकित झाल्यानंतर या मतदारांना मतदानाच्या वेळी पोस्टल मतपत्रिका, चाकाची खुर्ची, वाहन, आदी सुविधा पुरविणे निवडणूक कार्यालयासाठी सोयीचे ठरते. मतदार नोंदणीसाठी पात्र युवांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवावे तसेच मतदाराने प्रारुप मतदार यादीतील आपली तपशील अचूक आहेत का याची खात्री करून घ्यावी शिवाय मतदार नोंदणी नाव वगळणी तपशिलातील दुरुस्त्या या सुविधा NVSP Voter Portal या संकेतस्थळावर आणि Voter Helpline या मोबाईल ॲप वर उपलब्ध आहेत असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय मीना यांनी केले आहे

गडचिरोली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध असलेल्या यादीतील तीनही विधानसभा मतदार संघामधील एकूण मतदार संख्या 796796 एवढे आहेत. त्यामध्ये आरमोरी (67) विधानसभा मतदार संघामध्ये पुरुष – 129779 , स्त्रीया १२८३७२, इतर १ अशी एकूण 258152, गडचिरोली (68) विधानसभा मतदार संघ – पुरुष- 150621, स्त्रिया – 144472, इतर -0 अशी एकूण 295093 तर अहेरी (69) विधानसभा मतदार संघ पुरुष 123175, स्त्रिया- 120373, इतर 3 अशी एकूण 243551 मतदार संख्या आहेत.

जिल्ह्यातील मतदान केंद्रे

आरमोरी (67) विधानसभा मतदार संघात 299 मतदान केंद्रे असून भारत निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळालेली नवीन 2 मतदान केंद्रे असे एकूण 301, गडचिरोली (६८) विधानसभा मतदार संघ 346 मतदान केंद्रे असून भारत निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळालेली नवीन 8 मतदान केंद्रे असे एकूण 354 तर अहेरी (69) विधानसभा मतदार संघ 290 मतदान केंद्रे आहेत. म्हणजेच तीनही विधानसभा मतदार संघात ९३५ मतदान केंद्रे आहेत तर भारत निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळालेली १० मतदान केंद्रे आहेत असे जिल्ह्यात एकूण 945 मतदान केंद्रे आहेत.

मतदार संघनिहाय दिव्यांग मतदार

आरमोरी (67) मतदार संघ : पुरुष 893, स्त्रिया 490 असे एकूण 1383.
गडचिरोली (68) मतदार संघ : पुरुष 992, स्त्रिया 560 असे एकूण 1552.
अहेरी (69) मतदार संघ : पुरुष 983, स्त्रिया 481 असे एकूण 1464 .
तीनही मतदार संघ मिळून पुरुष 2868, स्त्रिया 1531 तर एकूण 4399 एवढे मतदार आहेत.

वयानुसार जिल्ह्यातील मतदार संख्या

तीनही मतदार संघ मिळून असे 18 ते 19 वयोगटातील 3850, 20 ते 29 वयोगटातील 166427, 30 ते 39 वयोगटातील 180957, 40 ते 49 वयोगटातील 169847, 50 ते 59 वयोगटातील 131451, 60 ते 69 वयोगटातील 82522, 70 ते 79 वयोगटातील 42148, 80 ते 89 वयोगटातील 16115, 90 ते 99 वयोगटातील 3170 तर 100 च्या पलीकडील 309 असे एकूण 796796 मतदार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here