

– सहा हजारांची लाच स्वीकारली लाच
The गडविश्व
गडचिरोली : वडिलोपार्जित भाऊ हिस्सा हक्क सोड शेतजमिनीचे फेरफार करण्यासाठी ७५०० रुपयांची मागणी करून ताडजोडीअंती ६ हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारतांना महिला तालाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल २१ जून रोजी रंगेहाथ पकडले आहे. रोहिणी श्रीहरी कांबळे (३७) असे लाचखोर महिला तलाठ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार यांनी वडिलोपार्जित भाऊ हिस्सा हक्क सोड शेतजमिनीचे फेरफार करण्यासाठी तलाठी कांबळे यांच्याकडे गेले असता. तलाठी कांबळे यांनी सदर काम करून देण्यासाठी ७५०० रुपयांची मागणी केली. मात्र तक्रादार यांना कोणतीही रक्कम तलाठी कांबळे यांना देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा करून सापळा रचला असता मंगळवार २१ जून रोजी इंजेवारी येथील तलाठी कार्यालयात ताडजोडीअंती ६ हजार रुपये स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी तलाठी कांबळे विरोधात पोलीस ठाणे आरमोरी येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमान्यवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, सफौ प्रमोद ढोरे, पोहवा नथ्थु धोटे, पोना राजेश पदमगिरवार, स्वप्नील बांबोळे, श्रीनिवास संगोजी, पोशि संदीप उडाण, मपोशि विद्या म्हशाखेत्री, ज्योत्सना वसाके, चापोहवा तुळशीराम नवघरे यांनी केली.

