गडचिरोली : ‘संडे फॉर सोसायटी’ नवोपक्रमातून वाहतुकीच्या नियमाबाबत विविध फलकातून जनजागृती

218

– स्पंदन फाउंडेशन गडचिरोली व वाहतूक विभाग पोलीस स्टेशन गडचिरोली यांचा नवोपक्रम
The गडविश्व
गडचिरोली : दररोज अपघाताच्या घटना कानी पडतांना अनेक विचार मनात येत असतात. परंतु आपण आपल्या मनावर ताबा ठेऊन व सवयींमध्ये बदल करून काही अप्रिय घटना टाळू शकतो. यासाठी सर्वांनी वाहतुकीचे नियम कठोरपणे पाळले पाहिजे. त्यामुळे रस्ता अपघात आपण कमी करू शकतो. याचाच विचार करता जनसामान्यांना जागृत करण्याच्या दृष्टीने स्पंदन फाउंडेशन गडचिरोली व वाहतूक विभाग, पोलीस स्टेशन गडचिरोली यांच्या सौजन्याने आज 30 जानेवारी रोजी “संडे फॉर सोसायटी’ या नवोपक्रमाअंतर्गत शहरातील मुख्य इंदिरा गांधी चौक, आयटीआय चौक व जिल्हा न्यायालय चौक येथे वाहन चालवितांना घ्यावयाची काळजी याबाबतचे माहिती देणारे 75 विविध बॅनर लावण्यात आले.O
या उपक्रमासाठी डॉ.मिलिंद नरोटे यांच्यातर्फे आवश्यक ते साहित्य पुरविण्यात आले. या कार्याचा शुभारंभ इंदिरा गांधी चौक येथे डाॅ. मिलिंद नरोटे व सहाय्यक पोलिस निरिक्षक पूनम गोरे यांच्यातर्फे बॅनर दाखवून करण्यात आला.
यावेळी अभियंता डाॅ. सुरेश लडके, डॉ. पंकज साकीनालवार, डॉ.प्रशांत चलाख, डॉ.किशोर वैद्य,डॉ. ऊमेश समर्थ,डाॅ.धम्मदिप बोदेले,डाॅ. सौरभ नागूलवार, अभि. महेंद्र बिसेन,अभि.नयन कूल्लरवार, प्रफूल्ल पराते, मोहन मुरकूटे, गौरव निंबार्ते, सुशांत वाटघूरे, प्रशांत चिचघरे, महेश जिलेकार, ऊमेश लोहंबरे, चेतन गोरे तसेच वाहतूक पोलीस विभागातर्फे हेड काॅन्स्टेबल सुनिल हजारे, पोलीस संजय राठोड, सतेज मूंडे, मूकेश चांदेकर, वनिता धूर्वे, शालू मेश्राम, मयूरी कोडाप, शेवंती सुल्वावार, संजय नैताम हे सर्व प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here