गडचिरोली शहरातील पेट्रोल पंपातून निघाले पेट्रोल ऐवजी चक्क पाणी ? व्हिडिओ वायरल

377

– विडिओ सोशल मीडियावर वायरल

The गडविश्व
गडचिरोली : शहरातील एका पेट्रोल पंपातून पेट्रोल ऐवजी चक्क पाणी निघत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. यामुळे शहरात चर्चेला पांग फुटले आहे.

वायरल व्हिडिओ मागची सत्यता पडताळून पाहण्याचा आम्ही प्रयत्न केला असता वायरल व्हिडिओ मध्ये असे दिसून येत आहे की, काही नागरिकांनी त्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरले मात्र एका व्यक्तीस पेट्रोल ऐवजी पाणी असल्याचे कळते, सदर व्यक्ती सदृश्य पिण्याच्या पाण्याच्या बॉटल मध्ये पेट्रोल देण्यास सांगत आहे, पेट्रोल पंपावरील कर्मचारी बॉटल मध्ये पेट्रोल टाकतो तेव्हा पेट्रोल च्या नळी मधून सुरुवातीला पाणी येतांना दिसत आहे तर एक व्यक्ती पुन्हा त्याच बाटली मध्ये पेट्रोल टाकण्यास सांगतो तेव्हा त्याचा रंग हा बदललेला दिसत आहे तेव्हा पेट्रोल पंपावरील कर्मचारी हा पाणी नसून मिथेनाल असल्याचे सांगत आहे.
मात्र नेमका पेट्रोल की पाणी यावर मात्र प्रश्नचिन्ह उभे होत असून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल झाल्याने जिकडे तिकडे पेट्रोल विषयचीच चर्चा होतांना दिसत आहे. एकीकडे पेट्रोलचे दर शंभरी पार झाल्याने न परवडणारे झाले आहे मात्र अशाप्रकारचे प्रकरण समोर आल्याने पेट्रोल पंपावरील काळ्या रंगाची नळी बदलवून सदृश नळी लावण्यात यावी अशी मागणी सुद्धा जोर धरत असून विश्वास तरी कुणावर ठेवायचा असा प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे.

सदर वायरल व्हिडीओ बद्दल सत्यता पडताळून घेण्यासाठी आम्ही पेट्रोलपंप चालकाशी संपर्क केला असता सांगितले की पेट्रोल पंपातून निघणारा हा पाणी नसून मिथेनाल आहे. पेट्रोल मध्ये मिथेनालचे काही प्रमाण असते मात्र याठिकाणी पेट्रोलचे प्रमाण कमी व मिथेनालचे प्रमाण जास्त झाल्याने सर्व प्रकार घडला. या सर्व प्रकाराबाबत पेट्रोल कंपनीकडे तक्रार केली असून कंपनीचे लोक अधिक चौकशी करण्याकरीता येणार आहे  तसेच सद्यस्थितीत पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आला असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here