The गडविश्व
गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने १३६ पदांकरीता घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेची अंतिम गुणसूची यादी जाहीर करण्यात आली आहे.
१३६ पदांकरीता १९ जून रोजी लेखी परीक्षा पार पडली मंगळवार २२ जून रोजी लेखी परीक्षेची तात्पुरती गुणसूची जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर ज्या उमेदवारांना गुणासंबंधी काही आक्षेप असल्यास ३६ तासांचा अवधी देण्यात आला होता. परंतु दुर्गम अतिदुर्गम भागातील उमेदवारांना आक्षेप नोंदविण्यास अडचणी येत असल्या कारणाने परत आक्षेप नोंदविण्यासाठी ४८ तासांची मुदत वाढवून देण्यात आली होती. उमेदवारांकडून आलेल्या आक्षेपानुसार तात्पुरत्या गुणसुची यादीमध्ये किरकोळ बदल करून आता या लेखी परीक्षेची अंतिम गुणसूची यादी जाहीर करण्यात आली आहे.
