गडचिरोली : पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या

1223

– निलोत्पल असतील आता गडचिरोली जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक
The गडविश्व
गडचिरोली, २१ ऑक्टोबर : राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या बाबत गृह विभागाने शासन निर्णय आज २० ऑक्टोबर रोजी जाहीर केला. यात गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक ,अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर पोलीस अधीक्षक यासह इतरही जिल्हयातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबत कळविण्यात आले आहे.
गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची पुणे (ग्रा) येथील पोलीस अधीक्षक पदी, अपर पोलीस अधिक्षक समीर शेख यांची सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकपदी तर अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची लातूर जिल्हा पोलीस अधीक्षकपदी बदली पदस्थापणा करण्यात आली आहे. तर आता गडचिरोली चे जिल्हा पोलीस अधीक्षकपदी बृहन्मुंबई चे पोलीस उप आयुक्त निलोत्पल हे असणार आहेत.
तर चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकपदी राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबईचे उप आयुक्त असलेले रवींद्रसिंह परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बदलीने पदस्थापना

तसेच मोहित कुमार गर्ग,राजेंद्र दाभाडे, दीक्षितकुमार गेडाम, अजय कुमार बन्सल, अभिनव देशमुख, श्रीम. तेजस्वी सातपुते, मनोज पाटील, प्रविण मुंडे,जयंत मीना, राकेश कलासागर, पी.पी. शेवाळे, अरविंद चावरिया, दिलीप पाटील-भुजबळ, जी. श्रीधर, अरविंद साळवे, प्रशांत होळकर, विश्वा पानसरे व प्रविण पाटील, या भा.पो.से. अधिकाऱ्यांची आणि निकेश खाटमोडे, रा.पो.से., यांची महाराष्ट्र पोलीस अधिनियम याच्या कलम २२न यामधील तरतुदींनुसार, याद्वारे, बदली करण्यात येत असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत. त्या अनुसार, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, यांनी मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण/न्यायालय यांचे आदेश, निवडणुकीची आदर्श आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था, इत्यादी लक्षात घेऊन पुढील उचित कार्यवाही करावी असे आदेशीत आहे. हा शासन आदेश, पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक १ यांच्या शिफारशीचा यथायोग्य विचार करुन आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम याच्या कलम २२न मध्ये निर्दिष्ट सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.

©©©©©

#gadchiroli news #sp gadchiroli #ankitgoyal #samir shekh #somay mundhe # nilotpav #sp #policeadhikshakgadchiroli #chandrapur sp

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here