गडचिरोली पोलिसांच्या मदतीने मिळत आहे स्वयंरोजगार

220

– ३५ युवतींचे शिलाई मशीन वितरण
– पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण व शिवनकाम प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ
The गडविश्व
गडचिरोली : जिल्हयातील युवक/युवतींना रोजगार प्राप्त व्हावा व त्यातुनच त्यांची आर्थिक समृध्दी व्हावी या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतीदुर्गम भागातील युवक युवतींना पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातुन गडचिरोली पोलीस दल व BOI STAR RSETI, Gadchiroli यांचे संयुक्त विद्यमाने पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण व शिवनकाम प्रशिक्षण देण्यात आले होते. सदरचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षनार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम गडचिरोली पोलीस मुख्यालय परीसरातील ‘एकलव्य सभागृह’ येथे १८ मे रोजी रोजी पार पडला.
सदर निरोप समारंभात शिलाई मशिन व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेतलेल्या गडचिरोली जिल्हयातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील युवक-युवतींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. निरोप समारंभादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बीओआय स्टार आरसेटी च्या माध्यमातुन शिवणकलेचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या एकुण ३५ युवतींचे शिलाई मशीन, प्रमाणपत्र व बुके देऊन सत्कार करण्यात आले. तसेच गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण पूर्ण केलेल्या एकुण २०० युवक-युवतींना प्रशिक्षण किट (शुज, टी-शर्ट, पुस्तके, बुक, पेन्सील व पॅन्ट) इ. साहीत्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी हेमंत मेश्राम कार्यक्रम समन्वयक, कुनघाडकर, कार्यक्रम समन्वयक, सौ. संध्या कोतकोंडावार, तज्ञ मार्गदर्शिका (शिवनकाम) बीओआय स्टार आरसेटी गडचिरोली यांचे प्रशिक्षणार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केल्याबद्दल बुके व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले.
आजपर्यंत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडुन रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याद्वारे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून सुरक्षा रक्षक ४८४, नर्सिंग असिस्टंट ११४३, हॉस्पीटॅलीटी २९६, ऑटोमोबाईल २५४, इलेक्ट्रीशिअन १४२, प्लंम्बींग २७, वेल्डींग ३३, जनरल डयुटी असिस्टंट ३८, फील्ड ऑफीसर ११ तसेच व्हीएलई ४५ असे एकुण २४७३ युवक/युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
तसेच कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापुर, गडचिरोली व बीओआय आरसेटी गडचिरोली यांचे मार्फत ब्युटीपार्लर १०५ मत्स्यपालन ६० कुक्कुटपालन ४४४, बदक पालन १००, शेळीपालन ६७, शिवणकला १०५, मधुमक्षिका पालन ३२, फोटोग्राफी ३५, भाजीपाला लागवड ४५०, पोलीस प्रशिक्षण ७८०, टु व्हिलर दुरुस्ती ३४, फास्ट फुड ३५, पापड लोणचे ३०, टु/ फोर व्हिलर प्रशिक्षण ३७० असे एकुण २७३७ युवक युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे.
सदर निरोप समारंभ पोलीस अधिक्षक अंकित गोयल सा., अपर पोलीस अधिक्षक (प्रशासन) समीर शेख सा., अपर पोलीस अधिक्षक (अभियान), सोमय मुंडे मा. अपर पोलीस अधिक्षक अहेरी अनुज तारे सा. यांचे उपस्थितीत पार पाडण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता गडचिरोली जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सर्व प्रभारी अधिकारी पोस्टे/उपपोस्टे/पोमके त्याचप्रमाणे नागरीकृती शाखेतील प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार तसेच पोलीस अंमलदारांनी विशेष परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here