– काही आक्षेप असल्यास त्यांनी २४ सप्टेंबर २०२२ नोंदविण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, २२ सप्टेंबर : गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२२ करीरा लेखी परीक्षा, मैदानी चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर तात्पुरती गुणसूची यादी जाहीर करण्यात आली होती. आता लेखी चाचणी (पेपर क्रमांक 1 ) व मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या एकुण गुणांचे आधारे तयार करण्यात आलेली उमेदवारांची प्रवर्गनिहाय तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे.

यादी डाऊनलोड करा
उमेदवारांकरीता सुचना ::
१९ जून २०२२ रोजी गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती – २०२२ करीता मान्यता मिळालेल्या १३६ पदाकरीता लेखी परिक्षा घेण्यात आली होती.
१२ जुलै २०२२ रोजी शारिरिक चाचणीकरीता पात्र १४३६ उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात आली होती. त्याआधारे ६ ते ८ सप्टेंबर या कालावधीत गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती – २०२२ मधील शारिरिक चाचणीकरीता पात्र उमेदवारांची मैदाणी चाचणी घेण्यात आली.
त्यावेळी उमेदवारांचे शैक्षणीक कागदपत्रे, एनसीसी कागदपत्रे व इतर कागदपत्राची तपासणी तसेच शारिरिक मोजमाप करण्यात आले होते. त्याआधारे मैदानी चाचणी मध्ये सहभागी झालेल्या उमेदवाराचे गुण १५ सप्टेंबर २०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आले होते.
सदरची तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षा यादी ही लेखी चाचणी (पेपर कमांक 1 ) व मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या एकुण गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे. याकरीता साप्रवि शा.नि.क.एसआरव्ही 1012/प्र.क्र. 16/12/16-अ दि. 13.08.2014 व साप्रवि शासन शुध्दीपत्रक कमांक: सकिर्ण-1118 / प्र.क39 / 16-अ दि.19.12.2018 तसेच गृह विभाग शा.नि.क. पोलीस- 1819/प्र.क्र.316 / पोल 5 अ दि.10.12.2020 या शासन निर्णयाच्या आधारावर काढण्यात आलेली आहे.
सदरची तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षा यादी ही उमेदवारांचे माहितीकरीता पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे www.gadchirolipolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
प्रसिध्द करण्यात येत असलेल्या तात्पुरत्या निवड यादी व प्रतिक्षा यादी मध्ये उमेदवारांना काही आक्षेप असल्यास त्यांनी २४ सप्टेंबर २०२२ चे १८:०० वाजेपर्यंत पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्ष यांचे दुरध्वनी क्रमांक 8806312100 यावर किंवा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय / पोस्टे / उपपोस्टे / पोमके / पोलीस मुख्यालय येथे व्यक्तीगत आक्षेप नोदंवु शकतात. दिनांक 24.09.2022 चे 18.00 वा. नतंर प्राप्त होणा-या आक्षेपांची नोंद घेण्यात येणार नाही.
उमेदवारानी कुठल्याही प्रलोभन किंवा आमीषाला बळी पडु नये तसेच कोणतीही व्यक्ती अथवा संस्था आमिष किंवा प्रलोभन देत असेल तर गडचिरोली येथील समाधान कक्ष यांचे दुरध्वनी क्रमांक 8806312100 यावर तसेच उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालय/पोस्टे/उपपोस्टे / पोमके / पोलीस मुख्यालय येथे संपर्क साधावा आई आवाहन करण्यात आले आहे.