गडचिरोली : आज ‘सुरजागड’ प्रकल्पाची पर्यावरण विषयक जाहिर लोकसुनावणी, जिल्हावासियांचे लागले लक्ष

1158

– हजारो नागरिक उपस्थिती राहण्याची शक्यता
The गडविश्व
गडचिरोली, २७ ऑक्टोबर : नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर गडचिरोली येथे एटापल्ली तालुक्यातील बहुचर्चित सुरजागड पहाडावर सुरु असलेल्या लोहखनीज प्रकल्पाची पर्यावरण विषय जाहीर लोकसुनावणी आज गुरुवार २७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या जनसुनावणी करिता मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होण्याची शक्यता असून याकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.
सदर जनसुनावणीला एटापल्ली तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांनी विरोध दर्शिविला आहे. वने व पर्यावरण मंत्रालय, भारत सरकार यांची अधिसूचना १४ सप्टेंबर २००६ व सुधारीत अधिसूचना १ डिसेंबर २००९ अन्वये मे. लॉयड मेटल्स ॲण्ड एनर्जी लि., सुरजागड आयर्न ओर माईन, सुरजागड, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली या कंपनीद्वारे मे. सुरजागड आयन ओर माईन, सुरजागड, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली येथे प्रस्तावित वाढीव उत्पादनाकरिता ३४८.०९ हे, आर खाण लीज क्षेत्रात लोह खनिज उत्खनन ३.० दशलक्ष टन प्रतिवर्ष (ROM) ते १०.० दशलक्ष टन प्रतिवर्ष (ROM) क्षमतेच्या प्रकल्पाच्या प्रस्तावाबाबत पर्यावरणविषयक जनसुनावणी घेण्याकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अर्ज सादर केला आहे.
सदर प्रकल्पामुळे एटापल्ली तालुक्यातील बांडे, मल्लमपड (मत्यगण्ड), नागेर, परसाळगडी, सुरजागड, हेद्री, डकारा खु. (अकेराटोला), करमपल्ली, पेठा (स). आरेगुडा (झारेवाडा), कुदारी (कुद्री), नागुलवाडी (नागुलपाडी), मोहली (मोली) ही गावे प्रभावित होणार असून सदर प्रस्तावित प्रकल्पाची पर्यावरण विषयक जाहिर लोकसुनावणी आज २७ ऑक्टोबर रोजी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे दुपारी १२ : ०० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
वाढीव उत्खननाच्या प्रस्तावाला शासनाद्वारे मंजुरी मिळाल्यास मोठ्या उद्योगांना संधी प्राप्त होऊन हजारो युवकांना रोजगार प्राप्त होणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे तर अतिरिक्त लोहखनिज उत्खननाच्या प्रस्तावाला अनेक ग्रामसभांनी विरोध दर्शविला आहे. सुरजागडच्या वाढीव उत्खननाला विरोध करण्याचे आवाहन डाव्या आघाडीने केले होते. सुरुवातीपासूनच या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध होता. प्रकल्पातून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अनेक अपघात झाले, रस्त्यांची चाळण झाली, रस्त्यांवर धुळीचे प्रमाण वाढले याकरिता नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. तसेच हि जनसुनावणी एटापल्ली तालुक्यात घेण्यात यावी अशी मागणीही तालुक्यातील नागरिकांनी केली होती. आज होणाऱ्या जनसुनावणीमुळे जिल्हास्थळी विरोधकांसह समर्थक हजेरी लावणार असून याकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

अशी बघा जनसुनावणी

वे बॅक्स ॲप मिटिंग नंबर 2525 124 7095, पासवर्ड 27102022 असे असून वे बॅक्स मिटिंग लिंक https://mpcb.webex.com/mpcb/j.php?MTID=m894561849ed0c8444e3481253ccae70e हि आहे.

(#gadchiroli surjaagad etappli aheri, collector office gadchiroli Environmental Information Centre, Maharashtra Pollution Control Board)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here