– गडचिरोली शहरातील आरमोरी मार्गावरील प्रकार
The गडविश्व
गडचिरोली : शहरातून जाणााऱ्या राष्ट्रीय महामार्गावर खड्डयाचे सांम्राज्य पहावायास मिळत होते. सदर खड्डे संबंधित विभागामार्फत बुजविण्यात आले असले तरी ते अपघातास आमंत्रण देत असल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे. एकीकडे रस्त्याची डागडूजी केली जाते परंतु ती डागडूज प्रवाशांच्या जीवावर उठत असल्याचे चित्र सध्या शहरात पहावयास मिळत आहे. तेव्हा अपघातास आमंत्रण की रस्त्याची डागडूजी ? असा प्रश्न सुध्दा उपस्थित होत आहे.गडचिरोली शहरातील आरमोरी मार्गावर दरवर्षी प्रमाणे यंदाही अनेक ठिकाणी खड्डे पडलेले होेते. आरमोरी मार्गावर असलेल्या पाण्याच्या टाकी समोर मागच्या वर्षी प्रमाणेच यंदाही खड्डे पडलेले होते ते गिट्टी व मलबाच्या सहायाने बुजविण्यात आले मात्र सदर गिट्टी ही वर आली आहे तसेच अवजड वाहनाने रस्त्यावर पसरली आहे यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. खड्डे बुजविले असले तरी मात्र नागरिकांना याचा त्रास सहन करावे लागत आहे. केलेली डागडूजी हि निकृष्ठ दर्जाजी असल्याचे चित्र ही दिसत असून तसा सुर नागरिकांकडून निघत आहे. केलेली डागडूजी ही खड्डयांपासून मुक्तता मिळण्यासाठी की अपघातास आमंत्रण ? असा सवालही नागरिक विचारात आहेत. या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. एखादी अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न सुध्दा या ठिकाणी उपस्थित केला जात आहे. या गंभीर बाबीकडे संबधित विभागाने लक्ष देणे आवश्यक आहे.