गडचिरोलीत ११७ आदिवासी युवक-युवतींच्या भव्य सामुहीक विवाह सोहळ्याचे आयोजन

267

– गडचिरोली पोलीस दल, पोलीस दादालोर खिडकी व मैत्री परिवार संस्था नागपूरच्या संयुक्त विद्यामाने
– १३ मार्च रोजी शहरातील अभिनव लॉन येथे पार पडणार विवाह सोहळा

The गडविश्व
गडचिरोली : पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकी व मैत्री परिवार संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्हयातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त आदिवासी युवक-युवती व आत्मसमर्पीत नक्षल जोडप्यांसाठी एक अभूतपुर्व भव्य सामुहिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर भव्य सामुहिक विवाह सोहळा गडचिरोली शहरातील चंद्रपूर मार्गावरील अभिनव लॉन येथे १३ मार्च रोजी सकाळी १० वाजता संपन्न होणार आहे. यात १६ आत्मसमर्पीत नक्षल जोेडप्यांसह ११७ आदिवासी युवक-युवती विवाह बंधनात अडकणार आहेत.
गडचिरोली जिल्हयातील आदिवासी समाजातील आर्थिकदृष्टया कमकुवत आणि आत्मसमर्पीत नक्षली युवक युवतींना मुख्य प्रवाहात आणण्याच्या तसेच नागरिकांच्या मनातील भय दूर करून त्यांना मोकळा श्वास घेता यावा याकरिता पोलीस विभाग सातत्याने प्रयत्न करित आहे. गडचिरोली पोलीस दल व मैत्री परिवाराच्या वतीने या आधीही आदिवासी युवक युवतींच्या सामुहीक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेक जोडपे विवाह बंधनात अडकले. मागील दोन वर्ष कोरोना निर्बधामुळे यात खंड पडला होता. आता यंदा पुन्हा सामुहिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले असून हे चौथे वर्ष आहे. यात गडचिरोली जिल्हयातील 117 आदिवासी युवक युवतींचा सामुहिक विवाह सोहळयाचे आयोजन 13 मार्च रोजी करण्यात आले आहे. यात 16 आत्मसमर्पीत नक्षल युवक युवतींचा समावेश आहे.
या भव्य सामुहिक विवाह सोहळयाचे उद्घाटन गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदिप पाटील यांच्या हस्ते पार पडणार आहे. विवाह सोहळयाला उपस्थित राहून नवविवाहितांना आशीर्वाद दयावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे, नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार, आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि गंगाधर ढगे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here