खळबळजनक : मुंबईत INS रणवीर युद्धनौकेवर स्फोट, तीन जवान शहीद

157

The गडविश्व
मुंबई : मुंबईत INS रणवीर युद्धनौकेवर स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत तीन जवान शहीद झाले आहेत.नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे आज INS रणवीरच्या अंतर्गत (इंटर्नल) कंपार्टमेंटमध्ये हा स्फोट झाला आहे. जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्रतिसाद देत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. कोणतीही मोठी भौतिक हानी झाल्याचे माहिती नसली तरी तीन नौदल जवान यामध्ये शहीद झाले आहेत.
INS रणवीर युद्धनौका नोव्हेंबर 2021 पासून पूर्व नौदल कमांडकडून क्रॉस कोस्ट ऑपरेशनवर तैनातीवर होती आणि लवकरच बेस पोर्टवर परत येणार होती. या युद्धनौकेवर नेमका कोणत्या कारणाने झाला याचा तपास करण्यासाठी चौकशी मंडळाला आदेश देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here