The गडविश्व
नवी दिल्ली : भारतीय सुरक्षा दल त्यांच्या नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या नियुक्तीची आतुरतेने वाट पाहत आहेत. जनरल रावत यांच्या निधनाला एक महिना उलटूनही केंद्र सरकार नवीन सीडीएसबाबत निर्णय घेऊ शकलेले नाही. मात्र, या शोधात सरकारकडून लष्करात नियुक्त्या सुरूच आहेत. केंद्राने पूर्व लष्कराचे कमांडिंग असलेले लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांना देशाचे पुढील उपसेनाप्रमुख बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
https://twitter.com/ani_digital/status/1483368307244036096?s=19
एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दावा केला आहे की, जनरल पांडे यांची या पदावर नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यासह जनरल पांडे १ फेब्रुवारीपासून लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती यांच्या जागी उपलष्कर प्रमुख म्हणून नियुक्त होतील. जनरल मोहंती ३१ जानेवारीला निवृत्त होत आहेत.
