The गडविश्व
गडचिरोली : मुक्तिपथ अभियानातर्फे सोमवारी आरमोरी, गुरुवारी मुलचेरा, एटापल्ली तर शुक्रवारी कुरखेडा, सिरोंचा, अहेरी शहरातील तालुका कार्यालयात आयोजित क्लिनिकच्या माध्यमातून ५३ रुग्णांनी उपचार घेत दारूमुक्त होण्याचा निर्धार केला आहे.
दारूचे व्यसन हे एक मानसिक आजार आहे. यातून मुक्त होण्यासाठी उपचार घेणे आवश्यक आहे. जिल्हाभरातील अशा रुग्णांना तालुकास्थळी उपचाराची सोय उपलब्ध करून देण्यासाठी १२ ही तालुक्यात व्यसन उपचार क्लिनिक सुरु करण्यात आले. यामुळे शहरी, ग्रामीण, दुर्गम व अतिदुर्गम भागातील रुग्णांना सुद्धा उपचार घेणे सुलभ झाले आहे. आरमोरी शहरात सोमवारी आयोजित क्लिनिकच्या माध्यमातून ८, गुरुवारी एटापल्लीत ५ तर मुलचेरा १०, शुक्रवारी कुरखेडा ५, सिरोंचा ११, अहेरी १४ अशा एकूण ५३ रुग्णांनी उपचार घेतला.
दारूच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी ५३ रुग्णांनी पुढाकार घेत तालुकास्थळावरील क्लिनिकला भेट दिली. रुग्णांवर उपचार करीत त्यांना समुपदेशन सुद्धा करण्यात आले. यामुळे रुग्णांना व्यसनातून मुक्त होण्यासाठी मदत होणार आहे. जिल्हयातील रुग्णांनी जवळच्या तालुका क्लिनिकचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुक्तीपथ अभियानाने केले आहे.