क्रांतिज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फूले सार्वजनिक वाचनालय इंदिरानगर बर्डीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

218

The गडविश्व
आरमोरी : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील इंदिरानगर बर्डी येथील सार्वजनिक वाचनालयाचे क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका असे नामकरण आज १० मार्च २०२२ ला दुपारी २:०० वाजता करण्यात आले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले वाचनालयाचे सचिव अजय कुथे तर प्रमुख अतिथी म्हणून वाचनालयाचे अध्यक्ष नेपचंद्रजी पेलणे, प्रमुख अतिथी सौ. रोशनीताई काळबांधे, निकिता नैताम, प्रियंका ठेंगरी, सायली कानतोडे, प्रतीक काळबांधे, उपस्थित होते. मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन राहुल जुआरे यांनी केले तर आभार सुरज पडोळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here