कोविड लसीकरणाचा आढावा घेण्याकरिता सीईओ कुमार आशीर्वाद पोहचले तालुकास्थळी

164

THE गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यात आतापर्यंत ८२ टक्के लसीकरणा पूर्ण झाले आहे. अहेरी २८६३०. भामरागड १३०८७. चामोर्शी ९६४८ सिरोंचा ७२९९ एटापल्ली १८३३३, धानोरा १३७१६. कोरची-३७५० असे एकूण ९४४६३ लाभार्थी. या सातही तालूक्यातील लसीकरणाचे प्रमाण हे जिल्हयाच्या तुलनेत कमी आहे. जिल्हयात एकूण १५४२६२ नागरिकांचे लसीकरण होणे शिल्लक आहे. त्यामुळे या सात तालुक्यामध्ये जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद व पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी आपले अधिनस्त कार्यरत असलेली संपूर्ण यंत्रणा या कामाकरीता लावलेली आहे.
लसिकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याकरीता जिल्हा परिषद, गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिनांक २७ ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत सलग ५ दिवस अहेरी, भागमरागड, एटापल्ली , धानोरा, चामोर्शी, सिरोंचा व कोरची तालुक्यात सभा घेऊन जिल्हयातील कोरोना लसीकरण १०० टक्के करण्याकरीता आरोग्य यंत्रणा, तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील, ग्रामसेवक यांची एकत्रित सभा घेऊन आढावा घेतला.
याद्वारे तालुक्यातील लसीकरण १०० टक्के करणेस्तव जबाबदारी निश्चित करण्यात आली. जानेवारी २०२२ अखेरपर्यंत कोविड- १९ ची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे. या अगोदर आलेल्या दोन लाटांमध्ये जिल्हयात लसीकरण १०० टक्के न झाल्यामुळे कोविड-१९ चे रुग्ण मोठया प्रमाणात आढळूण आलेले होते व मोठया प्रमाणात जिवीतहाणी झालेली होती. त्यामुळे आता पुर्वतयारी म्हणून जिल्हयातील सर्व नागरीकांचे १०० टक्के लसीकरण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून प्रशासनाकडुन नियोजनबध्द कार्यक्रम आखण्यात आलेला आहे. त्यानुषंगाने ०३ ते १५ जानेवारी २०२२ या दोन आठवडयामध्ये तारीखनिहाय विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. लसीकरणाची अंमलबजावणी करण्याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांचेकडुन घेण्यात आलेल्या सभेवेळी एटापल्ली व भामरागड तालुक्याचे उप विभागीय अधिकारी शुभम गुप्ता, धानोरा व गडचिरोलीचे उप विभागीय अधिकारी आशिष येरेकर, अहेरी व सिरोंचा तालुक्याचे उप विभागीय अधिकारी अमोल ठाकूर , सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री आदीसह तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल तसेच इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here