The गडविश्व
कोरची : ब्लड डोनर ग्रुप कोरची तर्फे स्थानिक पारबताबाई विद्यालय येथे आज १३ जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये ३३ पेक्षा जास्त जणांनी आपला सहभाग नोंदवला होता. पैकी १७ रक्तदात्यांचे रक्त घेण्यात आले. रक्तदान हेच श्रेष्ठदान संबोधून ब्लड डोनर ग्रुप कोरची तर्फे १३ जानेवारीला सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रक्तदाब, रक्तगट तसेच हिमोग्लोबिनची सुद्धा तपासणी करण्यात आली.
या रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे अध्यक्ष कोरची चे तहसीलदार छगनलाल भंडारी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून बौद्ध महासभा कोरची चे अध्यक्ष रामदासजी साखरे, शासकीय आश्रम शाळेचे प्राचार्य ढोक, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल, डॉक्टर सचिन बरडे , डॉक्टर नरेंद्र खोबा, निनावे तहसील कार्यालय आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशिष अग्रवाल यांनी तर संचालन सुरज हेमके व आभार महेश चौधरी यांनी मानले.
सदर शिबिरात आशिष अग्रवाल , सुरज हेमके , जितेंद्र सहारे, अभिजीत निंबेकर, भूमेश शेंडे, पराग खरवडे , सुरेश जमकातन तसेच ब्लड डोनर ग्रुपच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.