– ४०० झाडाच्या रोपांची केले वृक्षारोपण
The गडविश्व
ता.प्र. / धानोरा, २२ जुलै : गडचिरोली जिल्ह्यातील अति दुर्गम भागातील कारवाफा येथे वेगवेगळ्या ठिकाणी ११३ बटालियन राज्य राखीव पोलीस दल च्या वतिने एकुण ४०० झाडाच्या रोपांची लागवड बुधवार २० जुलै रोजी करण्यात आली.
केद्रिय रिझर्व्ह पोलीस दलाच्या जवानांनी सीआरपीएफ जी.डी. कंपनी द्वारा ग्रामपंचायत कारवाफा, मडावी शाळा, शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत चिंच, आवळा, सिताफळ, पपई इत्यादी ४०० झाडांची रोपांची लागवड केली. भविष्यात या झाडांचा फायदा ग्रामवासियांना तसेच नागरीकांना व शाळेला होणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे असणे अवश्यक आहे. झाडे हि मानवाला शुद्ध हवा ऑक्सिजन देत असते त्यामुळे नागिकांनी होईल तेवढ्या शक्य झाडांची लागवड करावी असे पोलीस दलाच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी असिस्टंट कमांडट वैभव क्षीरसागर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मयूर भुजबळ यांच्या हस्ते झाड लावुन वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थितांनी वृक्षारोपणाचे महत्त्व विस्तृत सांगितले. देशात ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त झाडे लावण्याची आवश्यकता आहे .यामुळे पुढील पिढीला आणि देशाला झाडांचा फायदा होईल. केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती गावातील लोकांना देण्यात आले.
या कार्यक्रमाच्यावेळी कारवाफाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मयूर भुजबळ, राज्य राखीव पोलीस दल कारवाफाचे प्रभारी निरीक्षण जलसेन बघेल, पोलीस मदत केंद्र कारवाफाचे इन्चार्ज ए.पी.आई.अण्णासाहेब शिंदे, उपनिरीक्षक दीपक पवार, आश्रम शाळेचे मुख्याध्यपक विजय देवताडे, अधिक्षक गजानन सानप उपस्थित होते . तसेच राज्य राखीव पोलीस दल चे अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थित होते.
कार्यक्रमाचे समारोप निरीक्षक जीडी बाणामाली पात्रा यांनी केले. केन्द्रिय रिझर्व्ह पोलीस दल ११३ वाहिनीचे कर्मचारी उपस्थित होते. निरीक्षक जीडी बाणामाली पात्राने उपस्थित सर्वाचे आभार मानले.