The गडविश्व
मुंबई : विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यात गेल्या ७७ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एसटी महामंडळाने आवाहन केल्यानंतरही एसटी कर्मचारी मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने कारवाईचा बडगा उचलला आहे. अनेक कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. तर अनेक कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बाजवली आहे.
कोल्हापूरमध्ये कारणे दाखवा नोटीस मिळालेल्या एका कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. धनाजी गारगोटी असे या मृत कर्मचाऱ्याचं नाव असून ते गारगोटी आगारात कार्यरत होते.
धनाजी वायदंडे यांना महामंडळाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. कारवाईच्या भीतीने धनाजी यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एसटी कर्मचारी आत्महत्येची ही दोन दिवसातली दुसरी घटना आहे.