कमके येथील शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

103

– २० रुग्णांनी घेतला उपचार
The गडविश्व
गडचिरोली, ६ जुलै : एटापल्ली तालुक्यातील दुर्गम अशा कमके गावातील रुग्णांना उपचाराची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी गावपातळी व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकूण २० रुग्णांनी उपचार घेतला.
जिल्हयातील ग्रामीण, दुर्गम व अतिदुर्गम भागातील गावांमध्ये गाव संघटनेच्या मागणीनुसार व्यसन उपचार शिबिरांचे आयोजन केल्या जाते. आतापर्यंत जिल्हयातील अनेक रुग्णांनी उपचार घेत दारूच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. कमके गाव संघटनेच्या मागणीनुसार एक दिवशीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी २० रुग्णांनी पूर्ण उपचार घेत व्यसनमुक्त होण्याचा निर्धार केला आहे. सोबतच औषधोपचार सुद्धा करण्यात येते.
शिबिरात संयोजिका पूजा येलुरकर यांनी धोक्याचे घटक सांगत रुग्णांची केस हिस्ट्री घेतली तर साईनाथ मोहुर्ले यांनी समुपदेशन केले. दारूचे व्यसन हे एक प्रकारचे मानसिक आजार असून यातून बाहेर पडण्यासाठी उपचार घेणे आवश्यक आहे. दारूमुळे आपल्या शरीरावर दुष्परिणाम दिसून येतात आदी माहिती त्यांनी रुग्णांना दिली. शिबिराचे नियोजन व व्यवस्थापन तालुका संघटक किशोर मलेवार, प्रेरक रवींद्र वैरागडे यांनी केले. यशस्वीतेसाठी मुक्तीपथ गाव संघटन सदस्य गाव पाटील दुलसा झुरे, जोगी कुमोटी, गणेश कोवासे, आशा वर्कर चंद्रकला कुमोटी, रमीबाई पदा, मुख्याध्यापक अविनाश बारसागडे, शिक्षक अतुल कुनघाडकर यांनी सहकार्य केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here