The गडविश्व
गडचिरोली, १४ ऑगस्ट : आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अणि टॅक्सी चालक मालक यांच्या संयुक्त विद्यमाने आरमोरी येथे रॅली काढण्यात आली .यावेळी सर्व वाहन चालक यांना रस्ता सुरक्षेच्या बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मोटार वाहन निरीक्षक सचिन जमखंडीकर, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक हेमंत गावंडे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक घनश्याम खराबे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पवन येवले, वाहन चालक बाबा रत्नपारखी, अनिल सोमनकर आणि टॅक्सी चालक मालक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.