आयुष्मान भारत योजनेचे गोल्डन कार्ड तयार करून योजनेचा लाभ घ्या : डॉ. लिला मदने

244

– ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे आयुष्मान भारत योजनेचे गोल्डन कार्ड तयार करणे सुरू
The गडविश्व
चामोर्शी, १२ सप्टेंबर : येथील ग्रामीण रुग्णालयात एप्रिल २०२० पासून एकत्रित महात्मा ज्योतीराव फुले जण आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधान मंत्री जण आरोग्य योजना सुरु झाली आहे. या योजनेअंतर्गत अनेक रुग्णांनी मोफत उपचाराचा लाभ घेतला असून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी आपले गोल्डन कार्ड बनवून या योजनेमार्फत लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामीण रुग्णालय चामोर्शी चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. लिला मदने यांनी केले आहे.
चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात आयुष्मान भारत योजनेचे गोल्डन कार्ड तयार करणे सुरू आहे. या योजने अंतर्गत आता पर्यत ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे ४० पेक्षा जास्त रुग्णांना मोफत उपचाराचा लाभ देण्यात आला असून ७८ रुग्णांना योजनेत नोंदणी करून पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. महात्मा ज्योतीराव फुले जण आरोग्य योजेत ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न १ लाख किंवा त्या पेक्षा कमी आहे अश्या कुटुंबाचा या योजनेत समावेश होतो. पात्र कुटुंबाला प्रतीवर्ष १ लाख ५० हजार पर्यत व मूत्रपिंड प्रत्यरोपणासाठी २ लाख ५० हजार पर्यत लाभ घेता येतो.
आयुष्मान भारत प्रधान मंत्री जण आरोग्य योजनेत सामाजिक, आर्थिक, जातनिहाय जनगणना २०११ च्या पात्र यादी नुसार योजनेत समावेश आहे. या योजने अंतर्गत पात्र कुटुंबाला प्रतीवर्ष रुपये ५ लाख पर्यत वैद्यकीय सेवाचा लाभ घेता येतो. आयुष्मान भारत योजनेत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यां जवळ योजनेचे गोल्डन कार्ड असणे आवश्यक आहे. सदर गोल्डन कार्ड बनविण्याचे काम ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे सुरू असून गोल्डन कार्ड बनविण्यासाठी रेशन कार्ड व आधार कार्ड ची आवश्यक आहे तरी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी आपले गोल्डन कार्ड बनवून घ्यावे. गोल्डन कार्ड बनविण्यासाठी ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य मित्र होमदेव कोसमशिले यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. लिला मदने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here