आमदार गजबेंच्या पाठपुराव्याला यश : सीटी-१ वाघ अखेर जेरबंद

98

– तब्बल दोन महिण्यानंतर वाघाला जेरबंद करण्यात यश
The गडविश्व
देसाईगंज, १३ ऑक्टोबर : लगतच्या भंडारा जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्यातील वडसा वन परिक्षेत्र व गडचिरोली वन परिक्षेञात मागील काही महिण्यात तब्बल १३ जणांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या सीटी-१ या नरभक्षक वाघाला तब्बल दोन महिण्यानंतर जेरबंद करण्यात यश आले आहे.यासाठी वडसा वन विभागात सीटी-१ वाघाच्या हल्ल्यात पहिला बळी ठरताच आमदार कृष्णा गजबे यांनी सदर वाघाला जेरबंद करण्यासाठी सातत्याने वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरुच ठेवल्याने सदर वाघाला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी सतत वाघाच्या मागावर असल्यानेच जेरबंद करण्यात यश आल्याचे बोलल्या जाऊ लागले आहे.
भंडारा जिल्ह्यासह गडचिरोली, चंद्रपुर जिल्ह्यात आपली दहशत पसरवून तब्बल १३ निष्पाप नागरिकांचा बळी घेणाऱ्या सीटी-१ या वाघाने डिसेंबर २०२१ पासुन वडसा वन विभागात ६, भंडारा वनविभागात ४ व चंद्रपुर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वनविभागात ३ अशा एकुण १३ जणांचा बळी घेतला होता. वडसा वन विभागासह गडचिरोली वनविभाग सातत्याने वाघाच्या हल्ल्यात ठार होत असलेल्यांच्या घटनांत वाढ होत असल्याचे पाहु जाता येथील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी याबाबत वनमंत्र्यांकडे वाघाला जेरबंद करण्यासाठी पाठपुरावा करण्यासोबतच स्थानिक वनाधिकाऱ्यांना वारंवार धारेवर धरले होते.
दरम्यान सीटी-१ वाघाची अधिकाधिक दहशत पसरत असल्याचे पाहून व सदर वाघ केव्हाही, कधीही कोणावरही हल्ला करून ठार करीत असल्याचे व मागावर असलेल्या वन विभागाच्या रेस्क्यु टिमला वारंवार हुलकावण्या देत असल्याचे पाहून आमदार गजबे यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे तक्रार करून वाघाला तत्काळ जेरबंद करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या आदेशान्वये ताडोबा व्याघ्र शिघ्र बचाव दल चंद्रपुर, नवेगाव नागझिरा व्याघ्र शिघ्र बचाव दल आणि अमरावती प्रादेशिक व्याघ्र शिघ्र बचाव दल यांनी संयुक्तपणे मोहिम राबवून लावलेल्या सापड्यात अडकताच बंदुकितुन डार्ट मारून बेशुद्ध केले व वाघ शुद्धीवर येण्यापूर्वीच कोणतीही इजा न पोहचवता पिंजऱ्यात बंदिस्त केले.

सदर वनपरिक्षेत्रा अंतर्गत शेतशिवारात शेतीच्या कामासाठी, कुणी गुरेढोरे राखण्यासाठी गेलेले गुराखी, मोटारसायकल ने रस्त्याने जात असणारे वाटेकरी अशा अनेक व्यक्तींवर दबाधरुन बसलेल्या पटेदार वाघाने अचानक हल्ला करून अनेक व्यक्तींचा बळी घेतल्याने सदर वाघाला वन विभागाच्या वनाधिकाऱ्यांनी मोठ्या शिताफीने एकलपुरच्या जंगलात जेरबंद करण्यात यश मिळवल्याने परिसरातील धास्तावलेल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असला तरी यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहुन सीटी-१ वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्नशिल राहिलेले आमदार गजबे यांचे सर्वच स्तरावरुन कौतुक केले असुन वनविभागाच्या वनाधिकाऱ्यांवरसी अभिनंदनाचा वर्षाव केल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here