आधारविश्व फाऊंडेशन गडचिरोली तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर कार्यक्रमात खा.अशोक नेते यांनी दिली भेट भेट

109

– नवदुर्गा उत्सव मंडळ आशीर्वाद नगर गडचिरोली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
The गडविश्व
गडचिरोली, ४ ऑक्टोबर : सेवा पंधरवडा कार्यक्रमाच्या निमित्याने नवदुर्गा उत्सव मंडळ आशीर्वाद नगर गडचिरोली येथे आधारविश्व फाऊंडेशनच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या दरम्यान खासदार अशोक नेते यांनी भेट दिली.
आरोग्याच्या दृष्टिकोनातून शुगर तपासणी,बी. पी,हिमोग्लोबिन,सिकलसेल, किडनी,लिव्हर,थायरॉईड,स्त्री रोग तपासणी, आदी या शिबिरात १५३ लोकांची मोफत तपासणी करून त्यांना मोफत औषधी गोळ्याचे वितरण करून प्रभावीपणे राबवल ही बाब कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी अशा शिबिराचे आयोजन करणे अतिशय महत्त्वाचे व गरजेचे आहे. या शिबिराच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या तळागाळापर्यंत आरोग्याच्या सोयी सुविधा जनतेपर्यंत पोहोचविणे व आरोग्य क्षेत्राकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे असेही प्रतिपादन या प्रसंगी केले.
कार्यक्रमाचे आयोजक सौ.गीताताई एस. हिंगे यांना सामाजिक कार्यात रुची असल्याने या शिबिराच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी करून सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. या शिबिराच्या माध्यमातून अनेक लोकांनी लाभ घेतला. यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, नर्स, डॉक्टर, व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहभागाने हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी खा.अशोकजी नेते, किसान आघाडीचे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, महिला आघाडीच्या उपाध्यक्षा तथा आधार विश्व फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ.गिताताई एस.हिंगे, उपाध्यक्ष संजयजी बारापात्रे, शेखर गडसुलवार, सुनिता आलेवार, सुनिता साळवे, सुनील हिंगे, विकास अधिकारी, रक्षमवार, मंगेश रणदिवे, गजानन दहिकर, कविता बारापात्रे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here