आणखी १५ ते २० दिवस शाळा बंद राहणार : आरोग्य मंत्री राजेश टोपे

143

The गडविश्व
मुंबई : ग्रामीण भागात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत राज्यातील निर्बंध उठण्याची शक्यता नाही. कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण आणि निर्बंध गरजेचे आहेत. सध्या कोरोनाचा संसर्ग कमी करण्याला राज्याचे प्राधान्य आहे. राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शाळा चालू करण्यावर निर्णय घेतला जाईल. त्यामुळे राज्यातील शाळा आणखी १५ ते २० दिवस बंद राहणार आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राजेश टोपे यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषदेत राज्यातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. यावेळी मंत्री टोपे म्हणाले. कोरोना कमी होत आहे असे समजू नये. मुंबई आणि पुण्यात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट वाढत आहे. आज राज्यात 46 हजार कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. 14 टक्के कोरोनाबाधित लोक रूग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोना वाढत असला तरी दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील कोरोना रूग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात घट होत आहे. जानेवारीत मृत्यू दर 0.3 टक्के आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here