आज इयत्ता बारावीचा निकाल ; असा बघता येईल निकाल

1507

The गडविश्व
गडचिरोली : अनेक दिवसांपासून इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना व पालकवर्गाना निकालाची उत्सुकता होती. आता ही प्रतीक्षासंपली असून आज ८ जून रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
हा निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर www.mahahsscboard.in बघायला मिळणार असून आपण हा निकाल घरबसल्या आपल्या मोबाईलवर सुद्धा पाहू शकणार आहात. निकाल पाहण्यासाठी परीक्षेचा सीट नंबर/ रोल नंबर आणि आईचे नाव टाकणे आवश्यक असणार आहे. सीट नंबर चुकला तर आईच्या नावाने निकाल पाहता येणार आहे.
या परीक्षेस १४,८५,१९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८,१७,१८८ मुलं असून मुलींची संख्या ६,६८,००३ एवढी आहे.

अधिकृत संकेतस्थळ :

http://www.mahresult.nic.in/

http://www.hscresult.mkcl.org/

https://hsc.mahresults.org.in/

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.
तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here