आजपासून सर्च दवाखान्यात मासिक बालरोग व श्वसन विकार ओपीडी सुरु

134

– तज्ञ डॉक्टर उपेंद्र वेदपाठक ०४ जुलै ते ७ जुलै पर्यन्त करणार तपासणी
The गडविश्व
गडचिरोली, ४ जुलै : चातगाव येथील सर्च द्वारे निर्मित ‘घर आधारित माता व शिशु‘ (Home Based New-born Care) च्या सर्वश्रृत यशानंतर बदलत्या काळाच्या आरोग्याच्या गरजा लक्षात घेता सर्च हॉस्पिटल च्या माध्यमातून आता हॉस्पिटल मध्येच तज्ञ डॉक्टरांकडून बाल रोगांची व श्वसन विकारांची तपासणी व उपचार दिले जाणार आहेत. आजपासून ही ओपीडी सुरू झाली असून या ओपिडी मध्ये रुग्णांची तपासणी स्वतः डॉ. उपेंद्र वेदपाठक तज्ञ डॉक्टर करणार आहेत. तर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपणास हि सुविधा उपलब्ध असणार आहे. सुविधेचा पहिला टप्पा मे महिन्याचा पहिल्या आठवड्यात यशस्वी रूपाने पार पडला.
या मासिक ओपीडी मध्ये बालरोग विकार-जखम, संसर्ग, आनुवंशिक आणि जन्मजात परिस्थिती, कर्करोग, आणि अवयव रोग व श्वसन विकारांची तपासणी केली जाते. या सुविधेचा लाभ वयोगट ० ते १८ पर्यंतच्या रुग्णांना घेता येणार आहे.
सर्चद्वारे दिल्या जाणार्‍या इतर सर्व वैद्यकीय सेवांप्रमाणे ही सेवाही गरज असलेल्यांसाठी अगदी कमी किमतीत किंवा मोफत उपलब्ध असणार आहे. गरजू रुग्णांनी याचा लाभ घेऊन उपचार करावा असे सर्च व्यवस्थापनाने आवाहन केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here