आजपासून सर्चमध्ये मूत्रविकार ओपीडी

174

The गडविश्व
गडचिरोली, १८ नोव्हेंबर : धानोरा तालुक्यातील सर्चमधील रुग्णालयात १८ व १९ नोव्हेंबर अशा दोन दिवशीय मूत्रविकार ओपीडीचे आयोजन करण्यात आले आहे. मूत्रविकार असलेल्या रुग्णांची तपासणी मूत्ररोगतज्ञ डॉ. मालव मोदी करणार आहेत.
मूत्राशयाचे कर्करोग, मूत्रभाग व किडणीचे सर्व कर्करोग, मूत्रभागाच्या संसर्गावर उपचार, अंडाशयावर सूज, किडनी स्टोन, मूत्राशयात खडे, मुतखडा निदान, झोपेत लघवी करणे, मूत्रमार्ग कडक असणे, लघवीतून रक्तस्राव, प्रोस्टेट समस्या, मूत्राशय नियंत्रण, आदी लक्षणे असलेल्या रुग्णांनी सर्च रुग्णालयाला भेट देऊन तपासणी करावी. या ओपीडीसाठी रुग्णांनी सकाळी ९ ते २ वाजतापर्यंत नोंदणी करून लाभ घेण्याचे आवाहन सर्चने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here