आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्य गोंडवाना विद्यापीठात ऑनलाईन विशेष व्याख्यान

373

The गडविश्व
गडचिरोली : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्य ८ मार्च २०२२ रोजी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीतील पदव्युत्तर शैक्षणिक विभागाच्या वतीने विशेष ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या विशेष व्याख्यानात गुरुनानक कॉलेज मुंबईच्या हिंदी विभाग प्रमुख डॉ.मनप्रीत कौर हे ‘शाश्वत उद्यासाठी आजपासून स्त्री पुरुष समानता’ या विषयावर विशेष मार्गदर्शन करणार आहेत.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे तर विशेष अतिथी म्हणून प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल चिताडे यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्या संयोजिका समाजशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापीका डॉ.रजनी वाढई यांनी सांगितले की विविध क्षेत्रात महिलांनी केलेली प्रगती अजून वाढावी व महिला अजून सक्षम व्हाव्यात या प्रबळ भावनेने जगभरात महिला दिन साजरा केला जातो. याच धर्तीवर पदव्युत्तर शैक्षणिक विभाग, गोंडवाना विद्यापीठ , गडचिरोली दरवर्षी विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या महिलांच्या सन्मानार्थ तसेच समाजात स्त्री पुरुष समानता निर्माण होण्यासाठी जागरूकता निर्माण करणे या हेतूने त्यांना आमंत्रित करत असते. हा कार्यक्रम सर्व क्षेत्रातील महिला, पुरुष तसेच विद्यार्थी या सर्वांसाठी आभासी पध्दतीने मायक्रोसॉफ्ट टीम द्वारे ८ मार्च २०२२ रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी अर्ज भरने आवश्यक आहे. कार्यक्रमाची नोंदणी लिंक तसेच क्यू आर कोड विद्यापीठाच्या वेबसाईटवर दिलेला आहे तसेच अधिक माहितीसाठी कार्यक्रमाचा व्हाट्सएप ग्रुप देखिल बनविण्यात आला आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रभारी कुलसचिव डॉ. अनिल चिताडे यांनी केले आहे.
नोंदणी करण्यासाठी लिंक आहे.
https://forms.office.com/r/3vNRSpUcZH

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here