अहेरी नगर पंचायत अंतर्गत सिमेंट रोडचे भूमिपूजन

718

– नगर पंचायत नगराध्यक्ष कु.रोज्या करपेत यांच्या हस्ते भूमिपूजन
– माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व न.पं. उपाध्यक्ष शैलेंद्र पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमीपूज संपन्न
The गडविश्व
अहेरी, ११ नोव्हेंबर : स्थानिक नगर पंचायत अतंर्गत प्रभाग क्रमांक १७ येथे पंचशील चौक ते पाण्याच्या टाकी पर्यंत व मुत्यालमा मंदिर ते रामा दब्बा तसेच गंगाराम सातारे ते गणपती इस्टाम पर्यंत असे लाखोंचे कामाचे सिमेंट काँक्रीट रोडचे भूमिपूजन अहेरी नगर पंचायतचे नगराध्यक्षा कु.रोज्या करपेत यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व न.पं. उपाध्यक्ष शैलेंद्र पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थिती होती.
अनेक वर्षापासून नागरिकांची मागणी असताना या कडे दुर्लक्ष केले जात होते मात्र यावेळी सत्ता परिवर्तन होताच सदर समस्याकडे लक्ष देवून नगर पंचायतच्या अण्णाभाऊ साठे या विकास निधीतून रस्ता मंजूर करण्यात आली असून नागरिकांना सोईस्कर होईल. या भूमिपूजन सोहळ्याला अहेरी न.प. बालकल्याण सभापती सौ.मीनाताई ओंडरे,, नगरसेविका सौ.जोतीताई सडमेक, नगरसेविका सौ.सुरेख गोडसेलवार, नगरसेविका कु.निखत शेख, नगरसेवक विलास सिडाम, नगरसेवक विलास गलबले, नगरसेवक महेश बाकेवार, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, मुख्याधिकारी अजय साळवे ,श प्रशासकीय अधिकारी सुजित आमने, कर निर्धारक वैभव पांढरे, गोविंदा दुर्गे आदी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here