– समस्या दूर करण्याची अजय कुकडकर यांची न.प. मुख्यधिकारी यांना निवेदनातून मागणी
The गडविश्व
गडचिरोली : शहरातील चामोर्शी मार्गावरील साई नगर वार्ड 21 मध्ये चुकीच्या ठिकाणी नाली बांधकाम केले तसेच अर्धवट नाली बांधकाम केल्यामुळे सांडपाण्याची अडवणूक होत आहे त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे विविध आजारांना निमंत्रण सुद्धा मिळत आहे. या समस्येकडे जातीने लक्ष देऊन उपाययोजना करावी अशी मागणी पीपल फॉर एनवोरमेन्ट अँड अनिमल वेल्फेअर चे अजय कुकडकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषद यांना निवेदनातून केली आहे.
शहरातील चामोर्शी मार्गावरील साई नगर वार्ड 21 मध्ये चुकीच्या ठिकाणी नाली बांधकाम केल्याने पाणी साचून असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच ज्या ठिकाणी रिकामे प्लॉट आहेत अश्या ठिकाणी नाली बांधकाम करण्यात आले मात्र ज्या ठिकाणी घर असून सांडपाणी जात असतो आशा ठिकाणी नाली बांधकाम करण्यात आले नाही. तसेच अर्धवट नाली बांधकाम केल्याने नवीन नाली ही उंच झाली आहे. त्यामुळे नालीतील सांडपाणी काही लोकांच्या घरा समोरील नालीमध्ये जमा होऊन नाल्या भरलेल्या आहेत. नवीन नाली बांधकाम करून सांडपाणी वाहून जाणे अपेक्षित होते मात्र चुकीच्या ठिकाणी अर्धवट नाली बांधकाम केल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून विविध आजारांना निमंत्रण देण्यासारखे झाले आहे तर आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याबाबत अनेकदा नगर परिषदेला तोंडी सुचना देण्यात आली मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे तर याकडे जातीने लक्ष देऊन समस्येचे निराकरण करावे अशी मागणी पीपल फॉर एनवोरमेन्ट अँड अनिमल वेल्फेअर चे अजय कुकडकर यांनी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनातून केली आहे.