अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर ईडीची मोठी कारवाई

173

The गडविश्व
मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्यावर ईडीने कारवाई केली आहे. यात अभिनेत्रीची सात कोटींहून अधिकची संपत्ती जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. ईडीने ७ कोटी रुपयांच्या भेटवस्तू आणि मालमत्ता जप्त केल्या आहेत. भेटीपोटी मिळालेल्या वस्तू या गुन्ह्यातून होत्या. या भेटवस्तू आणि मालमत्ता सुकेश चंद्रशेखर यांनी दिल्या होत्या, अशी माहिती ईडीकडून देण्यात आली आहे.
जॅकलिन फर्नांडिसने हिच्या संमतीशिवाय सुकेश चंद्रशेखरसोबतचे तिचे काही फोटो सोशल मीडियावर लीक झाल्यानंतर जॅकलिन अधिक चर्चेत आली. तसेच सुकेश चंद्रशेखर याचा समावेश असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात समावेश आहे. त्याच्याशी संलग्न मालमत्ताबाबत ही कारवाई करण्यात आली आहे.
सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसला हिऱ्याची अंगठी देऊन प्रपोज केले होते. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जॅकलिन फर्नांडिसची चौकशी केल्यानंतर तिला सुकेश चंद्रशेखर यांच्याकडून कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू मिळाल्याचे आढळून आले. हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचेही बोलले जात आहे. सुकेश चंद्रशेकरने जॅकलीन फर्नांडिसला प्रपोज करुन हिऱ्याची अंगठी दिल्याचे ताज्या अहवालातून समोर आले आहे. या हिऱ्याच्या अंगठीवर J आणि S ही अक्षरे होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here