अनखोडा ग्रामपंचायत समिती देणार दारू व सुगंधित तंबाखू विक्रेत्यांना नोटीस

132

The गडविश्व
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथील ग्रामपंचायत कार्यालयात तंबाखूमुक्त जिल्हा विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हा दारू व तंबाखूमुक्त करण्याच्या हेतून ग्रापं समिती सक्रिय करण्यासाठी सरपंच रेखा येलमुले यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील दारू व सुगंधित तंबाखू विक्रेत्यांना नोटीस देण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
दरम्यान ग्रापं समिती पुनर्गठित करण्यात आली. ग्रामपंचायत अधिनियमानुसार दारू व तंबाखूविक्री बंदीसाठी कोणते कायदे आहेत, ग्रामपंचायतचे अधिकारी कोणते तसेच ग्रामपंचायत समितीला मुक्तिपथकडून दिलेल्या मार्गदर्शक सूचना तालुका संघटक आनंद इंगळे समजावून सांगितले. तसेच गावातील अवैध दारू बंद करण्यासाठी गाव संघटनेला गरजेनुसार सहकार्य करणे, गाव संघटनेच्या मागणीनुसार कृतीचे नियोजन करणे, दारू व तंबाखू विक्रेत्यांना नोटीस देणे आदी ठराव सर्वानुमते घेण्यात आले.
यावेळी उपसरपंच वसंत चौधरी, मुख्याध्यापक एस.पी. सलामे, पोलिस पाटील अशोक चहारे, ग्रापं सदस्य दिलीप कुरटकार, संध्या कुकडकार, आरोग्य सेविका राठोड, आशा स्वयंसेविका छाया निमसरकार, ललिता चहारे, नर्मदा निमसरकार, लीला कुरवटकार, रवींद्र कोहपरे, भंतेजी निमसरकार, सविता कस्तुरे, ग्रामसेवक बारसागडे, युवा कार्यकर्ते राहुल नायगमाकर, सोहन तिमाडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here